Shocking video: वाघ, सिंह, बिबट्या अशा जंगली प्राण्यांना जंगलात शिकार करताना पाहणं ही जणू पर्वणीच असते. कारण- बहुतांश वेळा हे प्राणी आपण टीव्हीवर किंवा फार फार तर प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यांमध्ये पाहतो. परंतु, त्यांचं खरं व्यक्तिमत्त्व हे जंगलातच पाहायला मिळतं. अशाच एका जंगलातल्या गेंड्यानं आसाममध्ये एका दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत संबंधित व्यक्तीचा तडफडून मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकीस्वाराच्या मृत्यूचा लाइव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

दुचाकीस्वारचा मृत्यू कॅमेरात कैद

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”

आसाममध्ये समोर आलेल्या मृत्यूला हुलकावणी देणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. गेंड्याने दुचाकीस्वाराचा पाठलाग करून त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३७ वर्षीय तरुण दुचाकीवरून जात असताना पोबितोरा वन्यजीव अभयारण्याजवळ गेंड्याने त्याच्यावर हल्ला केला. सद्दाम हुसेन असं या तरुणाचं नाव आहे. आसाम जिल्ह्यात घटनेच्या ठिकाणापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या कामरूप मेट्रोपॉलिटन जिल्ह्यात तो वास्तव्यास होता. ३७ वर्षीय सद्दाम हुसेन आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होता. याच वेळी अभयारण्यातून गेंडा बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने सद्दामचा पाठलाग सुरू केला. यावेळी पाठलाग करीत त्याने सद्दाम हुसेनला ठार केलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गेंड्याने तरुणाला खुल्या मैदानात पळवलं अन् अखेर…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या मधोमध गेंडा उभा आहे. गेंड्याला पाहून काही लोक रस्त्याच्या एका बाजूला उभे आहेत. तर, दुसऱ्या बाजूला दुचाकीस्वार उभा आहे. जेव्हा गेंड्यांनी दुचाकीस्वारावर हल्ला केला, तेव्हा जीव वाचवण्यासाठी त्याने शेतात धाव घेतली. परंतु, गेंड्याने त्याचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला अक्षरश: चिरडून मारल्याचं दिसत आहे. तिथे जमलेल्या लोकांनी आरडाओरडा करून, दगड मारून गेंड्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. गेंड्याच्या हल्ल्यात अखेर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या व्यक्तीचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, तरुणानं मगरीबरोबर केलेलं कृत्य पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ocjain4 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. यावेळी नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकानं म्हंटलं “अगदी काही सेंकदासाठी तो अडकला”, तर आणखी एकानं प्रतिक्रिया देत “तो काळ बून आला होता” असं म्हंटलंय.

Story img Loader