Shocking video: आपल्यापैकी कित्येकजण कामानिमित्त विमान प्रवास करत असतील. आपल्या विमानप्रवासादरम्यान, प्रवाशांची काळजी घेणं आणि त्यांचा प्रवास सुसह्य करणं ही एअर होस्टेस्टची प्रमुख जबाबदारी असते. यामध्ये विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुखसोयी, समाधान आणि सामान्य गरजांकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. दरवाजात उभं राहून प्रवाशांचे हसतमुखाने स्वागत करणं, प्रवाशांना त्यांच्या आरक्षित जागेपर्यंत जाण्यासाठी दिशा दाखवणं, विमान उड्डाणापूर्वी आणि नंतर प्रवाशांना त्यांचे सीट बेल्ट बांधण्यास मदत करणं, त्यांचं सामान वरील रॅकमध्ये नीट रचून ठेवणं हे देखील त्यांना करावं लागतं. मात्र याच एअर होस्टेससोबत जर कुणी चुकीचं वागलं तर? चुकीचं सोडा एका प्रवाशानं एअर होस्टेससोबत अश्लील कृत्य केलंय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.
स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते.त्यात कधी कधी असे व्हिडीओ समोर येतात जे पाहून पायाखालची जमीन सरकते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एका विमानात एक अतिशय लज्जास्पद कृत्य घडलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका विमानात हवाई सुंदरी आपलं काम करताना दिसत आहे. तेवढ्यात विमानातील एक प्रवासी लपून तिच्या स्कर्टचा व्हिडीओ काढण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. बाहेरच्या सीटवर बसून या प्रवाशाने अगदी जमिनीलगत खाली मोबाईल लपवत हवाई सुंदरीचा अश्लील व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ aviator.alley नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “अरे जरा तरी लाज बाळगा” तर आणखी एकानं एवढी हिम्मत होतेच कशी यांची यांच्यावर कडक कारवाई करा अशी प्रतिक्रिया दिली आहे.