Shocking Video : सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा हिमस्खलनाचे व्हिडीओ पाहिले असतील. डोंगरावरून कोसळणारा बर्फ अतिशय वेगाने समोरच्या अनेक वस्तूंची नासधूस करून जातो. त्यात अनेकदा पर्यटकही अडकून पडतात. सध्या हिमाचल प्रदेशातील शिमला, मनालीतही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे, अनेक ठिकाणी बर्फावरून वाहने सरकल्याने अपघात होत आहेत. ट्रॅफिक जाममध्ये पर्यटक तासन् तास अडकून पडलेत. अशा परिस्थितीत तुम्हीदेखील शिमला, मनाली यांसारख्या बर्फाळ प्रदेशात फिरण्यासाठी जाणार असाल, तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक धक्कादायक व्हिडीओ पाहा, ज्यात पर्यटकांच्या अंगावर भलामोठा बर्फाचा तुकडा कोसळतो. त्यानंतर जी काही परिस्थिती उदभवली, ती फारच धक्कादायक होती. त्यामुळे क्षणात आनंददायी असणारे वातावरण अचानक भीतीदायक बनले.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत पर्यटक बर्फात मजा-मस्ती करत आहेत. पण, याच वेळी अचानक डोंगरावरील गोठलेल्या झऱ्यामुळे तयार झालेल्या बर्फाचा भलामोठा तुकडा त्यांच्या अंगावर कोसळतो, पर्यटकांनाही काय घडले समजायला मार्ग नाही. त्यामुळे तेही जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले.

Rumeysa Gelgi explained why she flies on a stretcher
जगातील सर्वात उंच महिला कसा करते विमान प्रवास? Viral Video पाहून व्हाल थक्क
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
elephant and her baby viral video
अरेरे! पिल्लाला झोपेतून उठवणारी आई; कधी सोंड, तर कधी शेपटी ओढत प्रयत्न सुरू; Viral Video पाहून आवरणार नाही हसू
Ajith racing accident
Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral
little girl dance
‘मराठी मुलगी आली…’ लहान मुलीने केला ‘छम छम करता है’ गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?

हा व्हिडीओ ५ जानेवारी रोजी चीनमधील शिआन, शांक्सी येथील हेशांचा नावाच्या धबधब्यावर घडलेल्या घटनेचा आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका बर्फाच्छादित डोंगरावर एक झरा थंडीमुळे संपूर्णत: गोठला आहे. या गोठलेल्या झऱ्याच्या खाली शेकडो पर्यटक बर्फाचा आनंद लुटत होते. याच वेळी अचानक डोंगरावरून बर्फाचा भलामोठा तुकडा पर्यटकांच्या अंगावर कोसळला; ज्याखाली अनेक पर्यटक गाडले गेले. लोक घाबरून जोरजोरात ओरडू लागले. काही जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. अनेक पर्यटकांच्या अंगावर हा तुकडा कोसळला. या दुर्घटनेत एक पर्यटक जखमीही झाला.

या धक्कादायक दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना या भागात येण्यास बंदी केली आहे. हा धक्कादायक व्हिडीओ @livingchina नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिलेय की, या प्रकारचा बर्फाळ धबधबा खूप धोकादायक आहे. अशा ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही हैराण झाले आहेत.

मृत्यूनंतरही यातना संपेनात! कर्मचाऱ्यांनी जनावराप्रमाणे मृतदेह नेला ओढत अन्…, माणुसकीला लाजवेल असा VIDEO

एका युजरने कमेंट केली की, लोक लहान मुलांबरोबर अशा ठिकाणी का जातात. यात प्रशासनाचा दोष नाही. आणखी एका युजरने लिहिले की, बर्फाखाली अजून काही लोक गाडले आहेत, असे मला का वाटते? आणखी एका युजरने लिहिले की, या भीषण अपघातात कुणालाही काहीही झाले नाही यासाठी आपण देवाचे आभार मानले पाहिजेत.

Story img Loader