Shocking video: कोणावर कधी कोणता प्रसंग ओढवेल हे सांगता येत नाही. आपल्यासोबतही अशा अनेक घटना घडतात; ज्याचा आपण कधीही विचार केलेला नसतो. मृत्यूचा घाला कधी, कोणावर अन् कसा ओढवेल, तसेच कोण कधी मृत्यूच्या जबड्यातून कशा रीतीनं बाहेर येईल ते सांगता येत नाही. असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. रशियात एक धक्कादायक घटना समोर आली आहे; जिथे १३ व्या मजल्यावरून खाली पडूनही २२ वर्षीय महिला बचावली आहे आणि सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या उंचावरून ही तरुणी पडल्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच श्वास रोखले गेले होते. पण, एवढ्यावरून ती तरुणी खाली पडूनही जिवंत असल्याचं पाहिल्यावर कोणीही सुटकेचा नि:श्वास सोडेल. पण, यावर साहजिकपणे तुमचा विश्वास बसणार नसला तरी हे प्रत्यक्षात घडलंय हे लक्षात घ्या. मग तिथे असा कोणता चमत्कार घडला, हे जाणून घेण्यासाठी तुमची उत्सुकता खात्रीने वाढली असेल. तेव्हा ती नेमकी दुर्घटना समजून घेऊ.

मृत्यूच्या दारात जाऊन परतली तरुणी

Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Terrifying Video hospital employess were seen dragging dead body
मृत्यूनंतरही यातना संपेनात! कर्मचाऱ्यांनी जनावराप्रमाणे मृतदेह नेला ओढत अन्…, माणुसकीला लाजवेल असा VIDEO
a young guy Caught Sleeping in Theater
चित्रपट संपला, लोक घरी परत जात होते, पण तरुण मात्र गाढ झोपलेला; थिएटरमधील VIDEO होतोय व्हायरल
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…
Shocking video truck accident video instead of helping him some people started lotting his mobile money
माणुसकी मेली..! अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर वेदनेनं ओरडत होता अन् लोकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
Pandurang Ulape Kolhapur
“..आणि मृत घोषित करण्यात आलेले आजोबा जिवंत झाले”, कोल्हापुरात घडली अविश्वसनीय घटना

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरुणीने काही क्षणांतच स्वत:ला सावरले आणि ती आरामात रुग्णवाहिकेकडे स्वत: चालत गेली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला भरदिवसा उंच इमारतीवरून गवतात पडली आणि नंतर स्वतःहून उठताना दिसत आहे. इतक्या उंचावरून खाली पडल्यानंतर आता तिचं काय होईल, अशी भीती मनात येत असतानाच पुढे जे दृश्य दिसतं ते पाहून आश्चर्याचा धक्का बसेल. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी! या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव या व्हिडीओमधून मिळतो. ही तरुणी अक्षरश: मृत्यूच्या दारात जाऊन परतली.

हा व्हिडीओ @vani_mehrotra नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यानंतर तो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरलदेखील झालाय. या व्हिडीओला आतापर्यंत हजारोंमध्ये व्ह्युज मिळाले आहेत. तर, अनेकांनी या व्हिडीओला लाइक केलंय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> यात्रेतल्या प्रचंड गर्दीत कपलचे अश्लील चाळे; जमलेले लोक बघत राहिले तरीही भान नाही, संतापजनक VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात १६ जुलै रोजी अशीच घटना घडली होती

डोंबिवली ग्लोब स्टेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नगीनादेवी ही तिचं काम झाल्यावर तिच्या इतर सहकाऱ्यांसोबत जिन्याजवळ बसली होती. ते एकमेकांशी बोलत होते, गप्पा मारत होते. नगीनादेवी जिन्याच्या जवळच बसली होती. बोलता बोलता तिच्या एका सहकाऱ्याचा हात तिला लागला आणि त्या दोघांचाही तोल जाऊन ते खाली कोसळले. ती बोलता बोलता खाली कोसळली. त्यावेळी बंटी हा तिचा सहकारीदेखील खाली पडला; मात्र इतरांनी त्याला कसेबसे वाचवले. पण, नगीनादेवी धाडकन खाली पडली आणि बराच रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.

Story img Loader