Shocking video: सोशल मीडियावर घरगुती भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सासू, सून, नवरा-बायको यांच्यातील छोट्या-मोठ्या भांडणाच्या अनेक घटना सोशल मीडियावर दिसतात. नवरा आणि बायको म्हटलं तर वाद हे होणारच. मात्र घरगुती हिंसाचार म्हटलं की, पुरुषांनी महिलांवर केलेला हिंसाचारच डोळ्यासमोर येतो. पण, वस्तुस्थिती अशी आहे की,पुरुषही महिलांकडून घरगुती हिंसाचार सहन करत असतात. अशाच एका जोडप्याला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे ते म्हणजे, “मर्द को दर्द नाही होता?’ हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.
मध्य प्रदेशातील सतना येथील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पत्नी पतीला मारहाण करताना दिसत आहे. भांडणाच्या वेळी पतीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये ती महिला पुरुषाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तर नवरा तिला टाळत असल्याचे दिसते. त्याचवेळी तो खोलीचा दरवाजा उघडण्यास सांगताना दिसत आहे. मात्र, व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्यामुळे संतापलेल्या महिलेने खोलीचे दिवे बंद केले आणि नंतर पतीला मारहाण केली.
नवरा बायकोचं नातं हे विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असतं. त्यातील एकानेही घराबाहेर दुसरं नातं बनवलं तर त्या नात्याला तडा जातो. नवरा बायकोमधील नात्याचा मूळ असतो तो म्हणजे विश्वास…एकमेकांवर काय प्रेम करु आणि एकनिष्ठ राहू असं लग्नाच्या विधीवेळी आपण वचन देतो. पण जेव्हा या दोघांमध्ये तिसरा येतो तेव्हा त्या विश्वासाला तडा जातो. पतीने पत्नीवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, पत्नी रात्री उशिरा घरी येते. कधीकधी ती ८-१० दिवस बेपत्ता असते. ती सतत कोणाशी तरी फोनवर बोलते आणि अपशब्द वापरते आणि जीवे मारण्याची धमकी देते. आज तकच्या वृत्तानुसार ही घटना काही महिने जुनी आहे. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याची पोलिसांनी दखल घेतली आहे.
पाहा व्हिडीओ
रिपोर्टनुसार, पीडितेच्या पतीने सांगितले की, २०१७ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्नाची पहिली सात वर्षे सर्व काही ठीक चालले. पण आठव्या वर्षी वडिलांचे निधन झाले, त्यानंतर सासऱ्यांच्या मृत्यूनंतर पत्नीने त्याच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकीही तिने दिली.वडिलांच्या मृत्यूनंतर पत्नीने त्याचा छळ सुरू केला. ती त्याला अनेकदा मारहाण करायची.
सोशल मीडियावर लोक व्हिडीओवर संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलं, शेवटी तोही माणूसच, तर आणखी एकानं महिलेवर टीका करत “अगं जरा तरी लाज ठेव” अशी प्रतिक्रिया दिली आहे.