Shocking video: बिबट्या हा अत्यंत चालाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडीतही शिकार करू शकतो. तो अत्यंत चपळ असतो. त्यामुळे वेळप्रसंगी तो पाण्यात शिरून मगरीशी देखील दोन हात करण्याची क्षमता ठेवतो. मात्र एका बिबट्याला चक्क जंगली डुक्करांनी आव्हान दिलं. अन् आश्चर्याची बाब म्हणजे हा खतरनाक शिकारी डुक्करांसमोर हतबल झालेला दिसला.परिणामी जीव वाचवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. हा विचलीत करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिबट्याची दहशत फक्त जंगलातच नव्हे तर माणसांपर्यंतही पसरलेली आहे. बिबट्याला पाहतच लोकांच्या पायाखालची जमीन हादरते आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी उलटे पाय धरून पळू लागतात. तो आपल्या थरारक शिकारीसाठी ओळखला जातो. बिबट्याच्या थरारक शिकारीचे शिकारीचे व्हिडिओज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या एक अजब व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात बिबट्या कोणत्या प्राण्याची नाही तर बिबट्याची शिकार होत असल्याचे दिसून येत आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी बिबट्यासाठी दु:ख व्यक्त केलंय. बिबट्या सारखा खतरनाक आणि चपळ प्राणी मेंढीच्या तावडीत कसा सापडला? हाच प्रश्न अनेकांना पडलाय. शिवाय बिबबट्याची शिकार करणं इतकं पण सोपं काम नाही. त्यामुळे सर्वजण अवाक् झाले आहेत. हा बिबट्या बर्फानं माखलेल्या डोंगरात मेंढ्यांची शिकार करत होता. या बिबट्यानं एक मेंढी निवडली आणि तिचा पाठलाग करू लागला. पण ती मेंढी सुद्धा तितकीच हुशार निघाली. तिनं या चालाख बिबट्याला कसा चकवा दिला पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिबट्या पूर्ण शक्तिनिशी तिचा पाठलाग करू लागला. पण ती मेंढी सुद्धा तितकीच हुशार निघाली. पळता पळता ती एका कड्याच्या टोकाला जाऊन लपली. ही बाब बिबट्याला कळली नाही. त्यामुळे बिबट्यानं पाठलाग करताना एक लांब अशी उडी मारली. पण या उडीनं त्याला थेट दरीत पोहोचवलं. बिबट्या कड्यावरून दरीत कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.

पाहा व्हिडीओ

बिबट्याच्या शिकारीचा हा थरारक व्हिडिओ @khichdishorts नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 7 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. एका युजरने लिहिले आहे, “आजकाल मेढ्यांना चांगलं अन्न मिळत आहे आणि बिबट्याची अवस्था बिकट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा बिबट्या जरा जास्तच लहान नाही का?”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video sheep killed a leopard on snow mountain animal video goes viral on social media srk