Shocking video: सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. पाण्याच्या ठिकाणी मस्ती करू नका, असे अनेकदा सांगितले जाते; मात्र तरीही तरुणाई ऐकत नाही. मग साहजिकच कित्येकदा अशा व्यक्तींना प्रत्यही जीवालाही मुकावं लागतं. धबधब्यावरील असाच एक स्टंट तरुणीच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रील्स बनवण्याच्या नादात अनेक लोक अशा गोष्टी करतात ज्यामुळे त्यांचा जीवच नाही तर इतरांचाही जीव देखील धोक्यात येतो. आपलं रील सोशल मीडियावर व्हायरल व्हावं हाच त्यांचा उद्देश असतो. पण कधी कधी रील बनवण्याच्या नादात आजूबाजूला काय परिस्थिती आहे हे सुद्धा लोक विसरतात. अशीच एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे.
एका महिलेने भावाच्या मृत्यूचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरात मागे एका व्यक्तीचा मृतदेह दिसत आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार हा तिच्या भावाचा मृतदेह आहे. एक महिला मृतदेहाला मिठी मारून मोठमोठ्याने रडत आहे. व्हिडीओ बनवणारी महिला त्या महिलेला वहिनी असं म्हणते. भाऊ गेल्याचं दुःख सोडा, रडणाऱ्या वहिनीला शांत करण्याऐवजी ही महिला व्हिडीओ काढत बसली आहे. तिने चेहरा रडवेला केला आहे. पण डोळ्यातून अश्रूचा एक थेंब बाहेर पडलेला दिसत नाही. रीलच्या नादात समोर परिस्थिती काय आहे हे सुद्धा या महिला विसरल्या असून यांनी निर्लज्जपणाची सगळी हद्दच पार केली आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DE4drYWSJFd/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर हा व्हिडीओ noble_mobile_shopee नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या महिलांना भावाच्या मृत्यूची रील काढताना पाहून लोकांचा संताप झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.