Railway accident video: बदलत्या जगात सोशल मीडियावर सक्रिय राहणे ही काळाची गरज बनत चालली आहे. प्रत्येक जण हा सोशल मीडियावर सक्रिय आहे. मग ते प्रत्येक क्षणाचे फोटोज सोशल मीडियावर टाकणे असो किंवा वारंवार सेल्फी काढणे असो.कधी कधी आपण लाइक्स आणि व्ह्यूजच्या नादात अशा काही करामती करतो. ज्यामुळे आपल्या इतर अनेक प्रसंगाना तोंड द्यावे लागते. ज्यामुळे आपला जीव ही जाऊ शकतो. रेल्वे ट्रॅकवर उभे राहून तुम्ही देखील सेल्फी, व्हिडीओ काढत असाल तर काळजाचा ठोका चुकावणारा हा व्हिडीओ तुम्हीही पाहा. रेल्वे ट्रॅकवर उभे राहून व्हिडीओ काढणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका रेल्वे ट्रॅकजवळ अनेक पर्यटक दिसत आहेत. यात अनेक महिला, पुरुष आणि लहान मुलं दिसतायत. रेल्वे ट्रॅकवरुन येणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी प्रत्येकाने आपला मोबाईल हातात धरलाय. ही लोकं अक्षरश ट्रॅकच्या जवळ असल्याचं दिसतंय. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार मेक्सिकोत्या हिडाल्गो इथं वाफेची इंजन असलेली जुनी ट्रेन या मार्गावरुन धावते. या ट्रेनबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे ट्रेनचा फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी दररोज या ठिकाणी पर्यटक येत असतात.

Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
maharashtra election 2024 yogi adityanath fact check viral video
भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ बुलडोझर घेऊन उतरले मैदानात! लोकांना हात जोडून केलं मतदानाचं आवाहन? Video खरा पण…
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण

सेल्फीची हौस जिवावर बेतली

या ट्रेनला ‘एम्प्रेस’ असं म्हटलं जातं. वाफेची इंजिन असलेल्या ट्रेनबरोबर फोटो घेण्याची पर्यटकांमध्ये उत्सुकता असते. घटनेच्या वेळीही या ट्रेनचा फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी अनेक पर्यटकांची गर्दी जमलेली व्हिडिओत दिसतेय. याचवेळी एक महिलेला ट्रेनबरोबर सेल्फी घेण्याचा मोह झाला. मोबाईलचा कॅमेरा ऑन करत ती महिला ट्रॅकच्या अगदी जवळ जाते. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत ही महिला आपल्या लहान मुलाला जवळ घेऊन सेल्फी घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. महिलेला सेल्फ घेण्याचा तयारीत असतानाच मागून वेगाने येणाऱ्या ट्रेनचा कोपरा महिलेच्या डोक्याला धडकतो आणि महिला जागेवरच कोसळते. अचानक घडलेल्या या घटनेने इतर पर्यटकांमध्ये खळबळ उडते. एक व्यक्ती त्या महिलेला ट्रेनपासून दूर खेचतो. पण त्या महिलेची कोणतीच हालचाल दिसत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लालबागनंतर भोपाळमधून संतापजनक प्रकार; चालू बसमध्ये ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी मारलं; थरारक VIDEO समोर

रेल्वे अधिनियम १९८९ द्वारा कलम १४५ व १४७ च्या अंतर्गत रेल्वे प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेणे कायद्याने गुन्हा आहे. या नियमानुसार तुम्हाला शिक्षा होऊ शकते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेताना जीवही जाऊ शकतो त्यामुळे हे टाळण्यासाठी १००० रुपये दंड आणि ६ महिन्यांचा कारावास भोगावा लागेल.