Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.
तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. नुसतं गाडी चालवतानाच नाही तर रस्त्यावरून चालतानादेखील लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. राजस्थानमधील नागौरमधील बिकानेर रोडवर गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एक एसयूव्ही कार होंडा एजन्सीसमोर तब्बल ८ वेळा पलटली आणि नंतर गेट तोडून कार आतमध्ये निघून गेली. धक्कादायक बाब म्हणजे गाडीत ५ व्यक्ती होते आणि एक व्यक्ती गाडी पलटताच बाहेर पडला. इतर ४ गाडीतच होते. विचित्र बाब म्हणजे पाचही व्यक्ती बाहेर येऊन ‘भाई, चहा पाजा’ असं म्हणून लागले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं.नागौर शहरातील बिकानेर रोडवर एक वेगवान एसयूव्ही ८ वेळा उलटली. एकदा वळताना, गाडीने पेट घेतल्यासारखे वाटले, कारण वळताना ज्वाला उठल्या. या अपघातातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे कोणालाही साथ खरचटलं देखील नाही, एवढेच नाही तर सर्वजण एक-एक करून होंडा मधून स्वतः बाहेर आले. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल नशीब की चमत्कार?
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @Balmukund Joshi नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत