Whale Attack Video: समुद्रातील जैवविविता आपल्या सगळ्यांनाच थक्क करणारी आहे. विशाल समुद्रात मुंगीच्या आकाराएवढे जीव, तसेच थेट ५० टनांपर्यंतचे देवमासेसुद्धा असतात हे आपल्याला माहीत आहे. देवमासा हा समुद्रातील सर्वांत मोठा मासा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याला पाहण्याची अनेकांना उत्सुकता असते. जमिनीवरील प्राण्यांप्रमाणे समुद्रामध्येही प्रत्येक जलचर जीव ठराविक भागांमध्ये आढळतो. वास्तव्याच्या ठिकाणी हस्तक्षेप केल्याने ते जीव समोरच्या जीवावर बचावाच्या दृष्टीने हल्ला करतात. देव माश्यांच्या बाबतीमध्येही असेच घडत असते. देवमासा सहजा माणसांना त्रास देत नाहीत. पण अनेकदा देवमाशानं माणसांवर हल्ला केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. मात्र, विचार करा हा मासा तुमच्या बोटीला धडकला तर? ऐकूनच भीती वाटली ना… मात्र असा प्रकार प्रत्यक्षात एका तरुणासोबत घडलाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साहजिकपणे हा व्हिडीओ पाहून लोक चकित झाले आहेत.

व्हेल आणि शार्कसारखे अनेक महाकाय प्राणी समुद्रात आढळतात, त्यापैकी हंपबॅक व्हेल हा शांत प्राणी मानला जातो. अशा परिस्थितीत महाकाय व्हेलमुळे समुद्रात प्रवास करणाऱ्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते, अशा घटना क्वचितच ऐकायला मिळतात. जर कोणी समुद्रात लहान बोटीने प्रवास करत असेल तर त्याला विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येतो, कारण हंपबॅक व्हेलच्या एका उडीमुळे छोटी बोट पलटी होण्याचा धोका असतो.

एका क्षणात बोट उलटवली

दरम्यान, सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महाकाय हंपबॅक व्हेल संपूर्ण बोट उलटून टाकते. चिलीच्या मॅगेलन सामुद्रातील सॅन इसिद्रो लाइटहाऊसजवळ कयाकिंग करताना एक प्रचंड मोठ्या हंपबॅक व्हेलने काही सेकंदात तरुणावर हल्ला करत त्याला जिवंत गिळलं. यावेळी हा तरुण सांगतो की,“मी माझे डोळे बंद केले आणि जेव्हा मी ते पुन्हा उघडले तेव्हा मला जाणवले की मी व्हेलच्या तोंडात आहे,” तरुण एड्रियनने बीबीसीला सांगितले. मात्र काहीच वेळात त्याला कोणतीही इजा न त्याने सोडून दिले. ही भीषण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जी आता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जेव्हा एड्रियन सिमांकासला व्हेलने गिळले तेव्हा त्याचे वडील डेल काही मीटर दूर होते. आपल्या मुलाला व्हेलच्या तोंडात जाताना पाहून वडील अजिबात घाबरले नाहीत आणि त्यांनी उत्तमरीत्या ही गोष्ट हाताळली. जेव्हा व्हेलने एड्रियनला सोडले तेव्हा डेलने आपल्या मुलाला शांत राहण्यास सांगितले. व्हिडिओमध्ये तो आपल्या मुलाला “शांत राहा, शांत राहा” असे सांगत असल्याचे ऐकू येते. वडील डेलने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ @goodmorningamerica नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे – बोटीवर असलेली व्यक्ती ठीक आहे की नाही? दुसऱ्या युजरने लिहिले आहे – म्हणूनच लाइफ जॅकेट घालणे खूप महत्वाचे आहे.

Story img Loader