Viral video : सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुठे काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावर लाइक्स मिळविण्यासाठी लोक इतक्या धोकादायक गोष्टी करतात की त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. याचा विचार करायला लावणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. अशा घटना याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत, जिथे सेल्फी काढताना लोकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. त्यामध्ये ट्रेनसोबत सेल्फी घेताना एक मुलगा गंभीर जखमी झालाय, याचा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

धोकादायक सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात कित्येक जणांचे जीव गेल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. तरीही अनेकांच्या डोक्यातलं हे सेल्फीचं खूळ कमी झालेलं नाही. या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता की, काही तरुण रेल्वे ट्रॅकवर उभे राहून सेल्फी घेण्यासाठी थांबले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी ट्रेन येताच सगळे रुळांवरून बाजूला होतात आणि मोबाईल फोन काढत सेल्फी काढण्याच्या तयारीत असतात. पण याच दरम्यान एका मुलासोबत असा अपघात झाला; ज्याने सगळेच हैराण झाले आहेत.

व्हिडीओ पाहता, त्याला खूप गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्टपणे म्हणता येईल. या अपघातानंतर आजूबाजूचे लोकही काही क्षमासाठी स्तब्ध जाले होते. हा व्हिडीओ कुठला आहे आणि या घटनेनंतर मुलीची प्रकृती काय आहे हे अद्याप कळालेले नाही.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/gharkekalesh/status/1850417137283723326

हेही वाचा >> प्रत्येकवेळी नशीब साथ नाही देत मित्रा; भर वेगात चार कार आमने-सामने; VIDEO पाहून सांगा चूक नक्की कुणाची?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी त्या मुलाची स्थिती कशी आहे, तो ठीक आहे की नाही याबद्दल विचारले आहे. तर एका युजरने म्हटले आहे की, तरुणांनी सोशल मीडियाच्या नादात त्यांच्या सुरक्षितेतकडेहीलक्ष द्यावे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, बाळांनो, आयुष्य म्हणजे खेळ नाही रे.