Shocking video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत असेल तर अपघात हे होतातच. अशावेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून आता तुम्हीच सांगा यामध्ये चूक नेमकी कुणाची आहे.
तसे अपघाताचे तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण हा एक असा व्हिडीओ, जो पाहिल्यावर तुम्हाला धडकी भरेल. ड्रायव्हिंग करता करता रस्त्यात असं काही घडलं की तुमच्या अंगावर काटा येईल. ३८ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. ज्यातील ५ सेकंद भयंकर आहेत. असं नेमकं काय घडलं ते पाहुयात.
नेमकं काय घडलं?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घाटात वळणा वळणाचा रस्ता आहे. यावेळी बाईक चालक अगदी बिनधास्तपणे बाईक चालवत आहे. मात्र पुढे असं वळण येतं की नक्की कशी गाडी पुढे न्यायची हेच त्याला कळलं नाही, त्यात समोरुन भलामोठा ट्रक आला. यावेळी दुचाकी चालक चढाव चढणाऱ्या ट्रकला कट मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी ट्रक चालकाने त्याच्या बाईकला उडवलं. यात बाईकचं मोठं नुकसान झालं. मात्र यानंतर ट्रकचालकाने जे काही केले त्यात चूक कोणाची, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीय. ट्रक चालकाला माहित होते की, एक दुचाकी आपल्या वाहनाच्या चाकाखाली आली आहे, तरीही त्याने वाहन तसंच त्या गाडीवरुन पुढे नेले. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा यात नेमकी चूक कुणाची?
पाहा व्हिडीओ
https://twitter.com/gharkekalesh/status/1871511674655744473
हेही वाचा >> कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर.” आणखी एका युजरनं म्हटलंय, “अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” तर आणखी एक म्हणतो, “अशा प्रकारे लोकांच्या जाणीवपूर्वक लोकांच्या जीवशी खेळणं कितपत योग्य आहे? “