Telangana Woman Ties Her Husband With Iron Chain: सोशल मीडियावर घरगुती भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सासू, सून, नवरा-बायको यांच्यातील छोट्या-मोठ्या भांडणाच्या अनेक घटना सोशल मीडियावर दिसतात. नवरा आणि बायको म्हटलं तर वाद हे होणारच. पृथ्वीतलावर असं एकही कपल नसेल ज्यांच्यात भांडणं होत नसतील. दरम्यान प्रॉपर्टीवरुन होणारे वाद काही नवे नाहीत. असाच एक संपत्तीवरुन सुरु झालेला वाद टोकाला पोहचला अन् बायकोनं नवऱ्याला चक्क तीन दिवस चैनने बांधून मारहाण करत घरात कोंडून ठेवले. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला असून आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तेलंगणामधून अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ४५ वर्षीय महिलेने मालमत्तेवरून पतीला तीन दिवस बेड्या ठोकल्या आणि त्याला अमानुषपणे मारहाण केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीचं नाव पट्टी नरसिंहा असं असून तो ५० वर्षाचा आहे. तसेच त्याच्या पत्नीचं नाव भरतम्मा असे आहे. या जोडप्यामध्ये मालमत्तेवरून वाद झाला. नरसिंहाच्या नावावर असलेल्या जमिनीच्या विक्रीवरून त्यांची दोन मुले आणि दोन मुलींमध्ये सातत्याने भांडणे होत होते. वृत्तानुसार, पतीने आपल्या पत्नीच्या मालकीच्या जमिनीवर घर बांधले.यावेळी घर बांधताना त्याने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या नावावर असलेली जमीन विकण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर वाद सुरू झाला आणि नरसिंह घर सोडून एकटेच राहू लागले.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
बुलढाणा : पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवले! माजी सैनिक अत्यवस्थ!
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून

३० एप्रिल रोजी भरतम्मा, तिचा नवरा भुवनगिरी जिल्ह्यात राहत असल्याचे समजल्यानंतर ती तिच्या मुलांसह त्याला भेटायला गेली आणि त्याला घरी घेऊन आली. त्यानंतर तिने नरसिंहाला लोखंडी साखळदंडाने बांधून एका खोलीत बंद केले. तसेच तीन दिवस बेदम मारहाण केली. दरम्यान या सगळ्याचा व्हिडीओ स्थानिकांनी गुपचूप त्यांच्या मोबाइल फोनवर शूट केले आणि याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ओरीप महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिला आणि तिच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> डॉक्टर-इंजिनीअरपेक्षा जास्त कमावतो ‘हा’ चिमुकला; अयोध्येत मंदिराबाहेर काय करतो? पाहा VIDEO

सोशल मीडियाचे जग हे वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेलं आहे. इथे कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी मनोरंजक व्हिडीओ तर कधी भांडणाचे, तर कधी आर्ट क्राफ्ट असे व्हिडीओ इथे समोर येत असतात. लोक आपल्या आवडी प्रमाणे व्हिडीओ पाहातात. पण सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल. हा व्हिडीओ नवरा-बाकोमधील नात्याला तडा गेल्याचा आहे.

Story img Loader