Viral video: सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मागील काही वर्षात देशातील गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. गावगुंड, चौकातील गुंडांनी कहर केल्याचं दिसतंय. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना नवीन आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तरुणांची दादागिरी काही संपायचं नाव घेत नाही आहे. अशातच आता पुण्यात एक प्रकार समोर आला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये क्षुल्लक कारणावरून मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.अशाच एका टोळीचा व्हिडीओ समोर आला आहे. ही टोळी पुण्यात कोयता गँग म्हणून ओळखली जाते. या टोळीतील तरुण लोकांना भर रस्त्यात कोयत्यानं मारतात आणि त्यांचं सामान घेऊन पसार होतात. मात्र ही गँग आता थेट लोकांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करतेय. असाच एक पुण्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तीन तरुण पुण्यात एका इमारतीत घराच्या बाहेर उभे आहेत. यावेळी ते घरातल्या लोकांशी बोलताना दिसत आहेत. इथपर्यंत सगळं व्यवस्थित दिसत आहे मात्र पुढच्याच क्षणी यातला एक तरुण कोयता काढतो आणि पाठीमागे लापवतो. आरोपीच्या हातात मोठा कोयता असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हे तरुण घर लुटण्याच्या इराद्यानं इमारतीत शिरले आहेत. यापैकी एका तरुणाचा हातात तुम्ही कोयत्यासारखं हत्यार पाहू शकता. हे हत्यार त्यानं पाठीमागे लपवलं आहे. अन् ते दाराची बेल वाजवत आहेत. पण सुदैवानं कोणी दरवाजा उघडला नाही.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पुण्यासह राज्यभरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. ‘जर गुन्हेगार घरापर्यंत पोहोचू लागले, तर शहरामध्ये कायदा-सुव्यवस्था आहे का?’ असा सवाल रहिवाश्यांनी उपस्थित केला. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू केले.
@Archana_Mirror नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “यांना जागच्या जागी ठेचलं पाहिजे” दुसरा म्हणतो, “एवढी हिम्मत येतेच कुठून?” आणखी एकानं “यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.