रेल्वे रूळ ओलांडण्याचे जीवघेणे प्रकार आपल्यासाठी नवे नाहीत. रेल्वे रूळ ओलांडणं हे कधी कधी जिवावर सुद्धा बेतू शकतं, असं कानी-कपाळी ओरडून सांगूनही कितीतरी महाभाग हा ‘प्रताप’ करताना दिसतात. या व्हिडीओमधील मुलगीही रूळ ओलांडण्यासाठीच प्लॅटफॉर्मवरून खाली उतरली होती. त्यातही आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे ही मुलगी अगदी आरामात फोनवर बोलत रेल्वे रूळ ओंलाडत होती. तितक्यात समोरून एक मालगाडी येत असल्याचं तिनं पाहिलं. समोर काळ उभा असतानाही प्रसंगावधान राखून ती दोन रुळांच्या मधोमध पडून राहिली. हा प्रकार पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. तिचं काय होणार, हे पाहण्यासाठी सगळेच पुढे सरसावले. अखेर मालगाडीचा शेवटचा डब्बा तिच्यावरून पुढे गेला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ती महिला जिवंत होती, सुखरूप होती आणि विशेष म्हणजे फोनवर बोलत होती. अंगावर मालगाडी गेली पण या पोरीनं फोनवर आपली गॉसिंपींग सुरूच ठेवली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनी एक नवी म्हण बनवलीय. ‘प्राण जाए पर फोन ना जाए’ अशा म्हणी या व्हिडीओवरून तयार लोक या प्रकारावर आपला संताप व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी रेल्वे रुळावर आडवी पडली आहे आणि ट्रेन तिच्या वरून जाताना दिसतेय. काही सेकंदांनंतर जेव्हा ट्रेन निघून जाते तेव्हा एक मुलगी रुळावर पडून फोनवर ती गॉसिपींग करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. ट्रेन गेल्यानंतर ती जागेवर ती उठून बसते आणि फोनवर बोलतच राहते.
आणखी वाचा : हात नसतानाही हा व्यक्ती बनवतोय चाउमीन; VIRAL VIDEO पाहून हैराण व्हाल
एवढंच नाही तर तिने चेहऱ्यावर ओढणीही बांधली आहे. यात तिचा जीव धोक्यात आला असता. ट्रेन धावत असताना तिच्या चेहऱ्यावरची ओढणी एखाद्या जागेवर अडकून ती ट्रेनबरोबर सरपटत पुढे जाऊन ट्रेन खाली येण्याचाही धोका होता. काळ आला पण वेळ आली नव्हती असं म्हणावं लागेल आणि ती यातून सुखरूप बाहेर पडली. काही सेकंदांच्या या व्हिडीओने लोकांना आश्चर्यचकित केलंय.
आणखी वाचा : रेल्वे स्टेशनवर या मुलाने अशी जबरदस्त उडी घेतली अन्…., पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : अनोखी कला! ही मुलगी चक्क दोन्ही हातांनी लिहिते, VIRAL VIDEO पाहून आश्चर्यचकित व्हाल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. प्रत्येकजण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो लोकांमध्ये अशा घटनांबाबत जनजागृती पसरवी यासाठी पुढे तो शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला ७५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही युजर्सनी असे धाडस न करण्याचं आवाहन केलंय, तर काही युजर्सनी टिकेचा भडीमार सुरू केलाय. काही युजर्स म्हणाले की ‘हे गंभीर आहे! या मुलीचा शोध घेऊन मानसशास्त्रज्ञांना दाखवण्याची गरज आहे.’ इतरांना तर या घटनेवर विश्वासच बसत नाहीय. आणखी दुसऱ्या एका यूजरने सांगितले की, हा मोबाईल एक दिवस जीव घेणार आहे. तर रागाच्या भरात काहींनी अशा बेफिकीर लोकांवर कडक कारवाईची सूचना केली.