Shocking video: प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्याने काही लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अडथळे येतात, असे म्हटले जाते. प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्याने काही लोकांचे वागणे बदलते, असेही म्हटले जाते. याचंच उदाहरण दाखवणारा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १४४ वर्षांनंतर आलेल्या भव्य महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. या मेळ्यातील अनेक व्हिडीओ, फोटो रोज सोशल मीडियावर येत आहेत. अनेक लोक यामुळे व्हायरल झाले आहेत. अशीच एक इंदूरमधील मोनालिसा नावाची १६ वर्षीय तरुणीही महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आली आहे. या माळा विकणाऱ्या मुलीच्या सौंदर्याची सगळीकडेच चर्चा आहे. त्यामुळे तिच्यावर अनेक रिल्स बनवले जात आहेत. अशातच आता ही सुंदरी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कारण तिनं एका युट्यूबरसोबत असं काही केलंय की पाहून तुम्हीही म्हणाल प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली..
सध्या सोशल मीडियावर माळा विकणाऱ्या एका सुंदर तरुणीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात अनेकजण तिच्या सुंदरतेवर भाळून तिच्याकडे एका सेल्फीची मागणी करताना दिसून येत आहे. काजळ घातलेले सुंदर डोळे आणि डस्की त्वचा असलेल्या मुलीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. तिचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, परंतु हा व्हिडीओ चुकीच्या कारणास्तव व्हायरल होत आहे. महाकुंभमेळ्यात दर्शनासाठी आलेले भाविक अक्षरश: रांगा लावून तिच्यासोबत फोटो काढत होते. पण इतकं फेम मिळत असताना सुद्धा या मुलीला कुंभमेळ्यातून पळ काढावा लागतोय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती लोकांवर इतकी भडकलीये की तिनं एका युट्यूबरचा अक्षरश: मोबाईलच तोडला.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अनेकजण तरुणीचा व्हिडिओ अथवा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढतानाही दिसतात. मुख्य म्हणजे, तरुणी तेथून निघून गेल्यानंतरही लोक तिचा पिच्छा सोडत नाही आणि तिच्या मागेमागे जाऊ लागतात. याचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे मात्र तिच्या वागणुकीमुळे सर्वजण तिच्यावर टीका करत आहेत. प्रसिद्धीची हवा एवढ्या लवकर डोक्यात घुसली का असा सवालही नेटकरी करत आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ laxmi_nath_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रया देत आहेत.