Thief shocking video : वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तुमची कितीही महागडी गाडी असू दे, ती चोरण्यासाठी चोर रोज नव्या आयडिया घेऊन येत असतात. अनेकदा चोर वाहन चोरी करण्यासाठी अशा काही आयडिया वापरतात, की पाहून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होते. सध्या अशाच एका बाईक चोरीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका चोराने बाईक चोरीसाठी अशी काय युक्ती वापरली आहे की पाहून तुम्हाला धक्का बसेल. तसेच पुन्हा कुठेही अनोळखी ठिकाणी बाईक पार्क करताना १०० वेळा विचार कराल. चोराने अवघ्या सेकंदात पायाने बाईकचे लॉक तोडले अन तो बाईक घेऊन पसार झाला. व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या बाईकच्या चोरीसाठी नेमकं काय केलं पाहा…

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, पुण्यासारख्या शहरांत बाईक चोरीच्या घटना सातत्याने घडतायत. चोर रस्त्यावर पार्क केलेल्या महागड्या बाईक्सचे इंजिन, महत्त्वाचे पार्ट्स रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरताना दिसतात. चोरीच्या घटनांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. पण, तुम्हीही जर अशाप्रकारे अनोळखी ठिकाणी रस्त्यावर बाईक पार्क करून बिनधास्त कुठेही जात असाल तर सावध व्हा. कारण व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक चोर अवघ्या सेकंदात बाईक चोरून पसार होतोय.

car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…
do you ever see a monkey flying a kite
Video : माकडाला कधी पतंग उडवताना पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच
Shocking video truck accident video instead of helping him some people started lotting his mobile money
माणुसकी मेली..! अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर वेदनेनं ओरडत होता अन् लोकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
Viral videos shocking video of st drivers drove the bus while drunk in badalapur
“अरे अजून किती जीव घेणार?” आणखी एका मद्यधुंद अवस्थेतील एसटी चालकाचा पराक्रम; बदलापूरातील VIDEO पाहून धडकी भरेल
Second Hand Bike tips
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या

हँडलवर पाय ठेवून लॉक तोडतो अन्….

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका ठिकाणी अनेक वाहनं उभी असल्याचे दिसत आहे, त्या वाहनांच्या मागे एक बाईकही उभी आहे. यावेळी एक चोर तिथे येतो आणि बाईकच्या सीटवर बसतो. जणू काही आपलीच बाईक आहे अशा उविर्भावात तो बाईकवर बसतो. यानंतर आजूबाजूला पाहतो आणि बाईक हँडल एका बाजूने पकडतो आणि दुसऱ्या बाजूने दोन्ही पाय ठेऊन लॉक तोडण्यासाठी बळाचा वापर करतो. अशाप्रकारे बाईकचे लॉक तोडल्यानंतर तो हाताने बाईक टर्न करतो पण बाईक सुरुच होऊ न शकल्याने तो बाईक चालवत घेऊन जातो. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही, पण हा व्हिडीओ मात्र खूप व्हायरल होतोय.

बाईक चोरीच्या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ @VishalMalvi_ नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आल आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भाऊ बाइकची चावी घरीच विसरला वाटतं”. दरम्यान, इतर युजर्सदेखील व्हिडीओवर खूप कमेंट्स करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, “किती सहज लॉक तोडले”. दुसऱ्या युजरने लिहिले की, “त्याची लॉक तोडण्याची टेक्निक तर पाहा”. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, “आजकाल ही एक गंभीर समस्या बनली आहे”.

Story img Loader