Shocking video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ हे थक्क करणारे असतात. ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं. जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते.
कुठलीही चोरी करण्यापूर्वी चोर प्रचंड अभ्यास करतात असं म्हटलं जातं. सर्वात आधी ते वस्तूचं बारीक निरिक्षण करतात. ती वस्तू कशी चोरता येईल या बद्दत नियोजन आखतात. अन् चोरी फसलीच तर काय करायचं याबाबतही प्लान बी रेडी असतो. चोरांना इतकी तयारी ही करावीच लागते. कारण चोरी करणं हा गुन्हा आहे. अन् जर तुम्ही पकडला गेलात तर तुमची काही खैर नाही. पोलीस नंतर मारतात आधी पब्लिकच चांगली धुलाई करते. अन् शेवटी तुरुंगाची हवा खावी लागते हे तर वेगळंच.
एका चोराचा व्हिडीओ समोर आला आहे. हा चोर एका महिलेचं पाकिट खेचून पळण्याचा प्रयत्न करत होता. पण तेवढ्यात समोरून एक कार आली अन् तिनं या चोराला अक्षरश: चिरडून टाकलं. ही संपूर्ण घटना रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्याक कैद झाली. एक महिला रस्ता ओलांडत असताना बाईकवरून आलेल्या एका चोरानं तिला पकडलं आणि तिच्या हातामधील बॅग जबरदस्तीनं खेचून पळत होता. पण बाईक सुरू करण्यापूर्वी एका कारवाल्यानं त्याला जोरदार टक्कर दिली. परिणामी तो खाली पडला. पण पुन्हा एकदा उठून तो पळ काढत होता. पण कारवाल्यानं पुन्हा एकदा त्याला धडक देऊन खाली पाडलं. असं दोन चार वेळा करून त्याची बाईक अक्षरश: त्यानं चिरडून टाकली.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ nikhilrana.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.