Shocking video: प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. वाघ, सिंह, बिबट्या या प्राण्याच्या ताकदीचा अंदाज आपल्याला आहेच. खतरनाक प्राण्यांसमोर छोट्या किंवा साध्या प्राण्यांचा टिकाव लागत नाही.

आजवर तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये वाघ, बिबट्या, सिंह या हिंस्र प्राण्यांना इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल. हे प्राणी आपली भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांच्या कळपांवरही हल्ला करतात. या हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं, त्यामुळे तोदेखील जीवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते, तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक वाघ बैलावर हल्ला करताना दिसतोय. या लढाईत शेवटी कोण जिंकलं पाहाच.

जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही. याच वाघाच्या तावडीत एक रेडा सापडला आणि सुरु झाली लढाई. मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका उद्यानात ही घटना घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वाघ आणि बैलामध्ये युद्ध सुरु आहे. यावेळी दोघेही स्वत:ची संपूर्ण ताकद लावत आहेत. एक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तर दुसरा समोरच्याचा जीव घेण्यासाठी. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वाघ शिकार केल्यानंतर बैलाला ओढत नेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुरुवातीला बैल वाघाला पकडत त्यावर नियंत्रण मिळवण्याचा आणि त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो खरा पण क्षणातच ते संपूर्ण दृश्य बदलते आणि वाघ बैलावर भारी पडतो. तो बैलाच्या मानेवर चावा घेतो आणि क्षणातच त्याला मारून टाकतो. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला वाघ बैलाचे शरीर खेचून नेत असल्याचे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @WildLense_India या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की,”ज्याच्याकडे धैर्य असते तोच जिंकतो” तर आणखी एकानं, “निसर्गापुढे कोणाचं चाललंय…” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader