Viral video: सध्या सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हीडिओ पाहायला मिळतात. अनेकदा जंगलातील प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी प्राण्यांच्या गमती जमती सुरू असतात, तर कधी प्राण्यांची भांडणं आपल्याला पाहायला मिळतात. त्यातले काही व्हीडिओ मजेदार असतात तर काही आश्चर्याचा धक्का देणारे असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जंगलात मांसभक्षी आणि तृणभक्षी प्राण्यांमध्ये कायम लपंडाव सुरू असतो. वाघ त्याला सावज दिसले की त्याची शिकार करण्यासाठी दबा धरून बसतो. तर सावजाला शिकाऱ्याची म्हणजेच वाघाची चाहूल लागली की तो आपल्या सुरक्षा कवचात शिरायचा प्रयत्न करतो. पण कित्येकदा का या लपंडावात वाघाचीच सरशी होते. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वाघानं नाहीतर चक्क वाघाच्या पिल्लानं भलीमोठी शिकार केली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हरीण किती चपळ प्राणी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र याच हरणाची आता शिकार झाली आहे. ही घटना राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये घडली आहे. या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, हरीण नदीवर पाणी पित होतं. पाणी पिताना ते थोडं बेसावध होतं. अन् हीच गोष्ट झाडांमध्ये लपून बसलेल्या वाघाच्या पिल्लांनी हेरली. मग काय संधी मिळताच या पिल्लांनी हरणावर जोरदार हल्ला केला. एका पिल्लानं तर अनुभवी शिकाऱ्याप्रमाणे हरणाच्या मानेवर वार केला. आणि बाकीच्या पिल्लांनी हरणावर मागून वार केला. यावेळी हरणानं संपूर्ण ताकद लावून प्रतिकार केला खरा पण शेवटी वाघांसमोर त्यानं हार मानली आणि त्याचा मृत्यू झाला.
यावेळी हरणाने दाखवलेलं धाडस आणि स्वत:चा जीव वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “बाई गं पिचली माझी बांगडी बांगडी” मराठमोळ्या गाण्यावर काकांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
सोशल मीडियावर @infoinsightdaily नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.