Shocking video: वाघ आणि सिंह हे जंगलातील सर्वात सामर्थ्यशाली आणि ताकदवान प्राणी आहेत. मात्र, अनेकदा या दोघांमध्ये अधिक सामर्थ्यवान कोण? किंवा जंगलाचा राजा कोण? असा प्रश्न अनेकांना पडतो. सोशल मीडियावर कधी सिंह तर कधी वाघाला जंगलाचा राजा म्हणून सांगितलं जातं. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, मात्र वाघाचेही जंगलात तेवढेच वर्चस्व असते. वाघ आणि सिंह यांची जंगलात आपली अशी एक दहशत असते. त्यामुळं फार क्वचितच वाघ आणि सिंह एकमेकांसमोर येतात. असाच एक वाघ-सिंहाच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कधी सिंह वाघावर तर कधी वाघ सिंहावर वरचढ ठरताना दिसत आहे. वाघ आणि सिंह यांच्यातील जबरदस्त लढाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण बऱ्याचदा हे पाहातो की, मोठे शिकारी जसे की, वाघ, बिबट्या, सिंह इत्यादी आपलं पोट भरण्यासाठी जंगलातील प्राण्यांचा शिकार करतात. ते बऱ्याचदा शाकाहारी प्राण्यांची शिकार करतात. पण मांसाहारी प्राण्यांच्या वाट्याला ते कधीच जात नाही. मात्र व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह आणि वाघ एकमेकांसमोर उभा असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. दोघांनाही स्वत: चं मरण समोर दिसत आहे त्यामुळे दोघंही स्वत:चा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह काही पावलं मागे सरकतो आणि मग अचानक वाघावर जोरदार हल्ला करतो. सिंह वाघावर गर्जना करत हल्ला करतो. हा व्हिडीओ व्हिडीओ केवळ ८ सेकंदांचा आहे. त्यामुळे पुढे काय घडलं सांगता येत नाही. पण व्हिडीओमधील स्थिती पाहाता ही लढाई वाघ हरला असेल अशी शक्यता आहे. कारण सिंहाचं पूर्ण कुटुंब त्याच्यावर हल्ला करू लागलं.

सिंहाला जंगलाचा निर्विवाद राजा ही पदवी मिळते. त्यामुळे “सिंह विरुद्ध कोणताही प्राणी” अशी लढाई झाल्यास कोण जिंकेल या प्रश्नाचे उत्तर स्पष्टच असावे, बरोबर? पण तुम्हाला माहिती आहे का अभ्यासकांच्या माहितीनुसार सिंह इतर कोणत्याही प्राण्यापासून जिंकू शकत असला तरी जंगलाचा डॉन म्हणजे वाघासमोर त्याला आपली सर्व शक्ती एकवटून लढायला लागते.

पाहा व्हिडीओ

दरम्यान मागील काही दिवसात प्राण्यांच्या लढाईचे अनेक विलक्षण व्हिडीओ समोर आले आहेत. कधी हत्तीवर सिंहीणीचा हल्ला, कधी झेब्र्याचा सिंहाशी लढा. हे व्हिडीओ पाहून जंगलातील थरार जवळून पाहण्याची संधी नेटकऱ्यांना मिळते. आता व्हायरल होणारा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला व तुम्ही वाघ की सिंह कोणाच्या बाजूने आहात हे नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video tiger vs lion fight who will win animal video viral on social media srk