Truck Accident Video : जगण्‍याचा वेग वाढलाय. येथे थांबायला कोणाचा वेळ नाही. सार्‍यानांचा कमालीचे घाई झाली आहे. प्रत्‍येक रस्‍त्‍यावरील हे चित्र आता आपल्‍या अंगवळणी पडलंय;पण एखादा अपघात झाला असेल तर किमान थांबणे अपघातग्रस्‍ताला उपचार करणे एवढी तसदीही कोणी घेताना दिसत नसल्‍याचेही आपल्‍याला कानावर येते. आजच्या काळात माणूसकी पूर्णपणे नाहीशी झाल्याच्या घटना आजूबाजूला पाहायला मिळतात. हल्ली लोक इतरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात पण त्यात संधी मिळाली तर फक्त स्वत:चा फायदा बघत राहतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनेक अपघात होतात. या अपघातावेळी काहीजण मदत करण्याऐवजी चालकाचे पैसे, दागिने किंवा त्याच्या गाडीतील वस्तू चोरी करत पसार होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल की लोकं असं कशी वागू शकतात.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रकचा भीषण असा अपघात झाला असून ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. यावेळी तो वेदनंन विव्हळतोय मात्र जमलेले लोक त्याला मदत करण्याएवजी त्याचा मोबाईल आणि पैस चोरताना दिसत आहे. हा जखमी ड्रायव्हर मदतीसाठी विनवण्याही करताना दिसत आहे मात्र कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही. अशा प्रकारे माणुसकीची हत्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. हा सगळा प्रकार पाहून माणसात आता माणुसकी शिल्लक राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित होतो.

Kanpur Fire
Kanpur Fire : धक्कादायक! दिव्यामुळे घराला लागली आग; उद्योगपती पती-पत्नीसह मोलकरणीचा दुर्दैवी मृत्यू
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
The young man poured petrol on the snake
“देव माफ करेल कर्म नाही” तरुणानं सापावर पेट्रोल टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Tragic shocking Video: 4-Yr-Old Girl Drowns In Ganga As Her Aunt Makes Instagram Reel In UP’s Ghazipur
Shocking video: रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; ती बुडत होती अन् आई-मावशी रील बनवत राहिल्या…
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Shocking video taking a selfie with a running train puts a boy in danger shocking video
“बाळांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही रे” सेल्फी घेण्यासाठी ट्रॅकच्या बाजूला उभा राहिला, पण मागून मृत्यू धावत आला; थरारक VIDEO
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?

रस्ते अपघात ही देशातील चिंतेचा विषय बनत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोक वाहतूकीचे नियम पाळत नाहीत. यात अनेकदा रात्रीच्या वेळी भरधाव ट्रक अनेकदा अपघाताचे बळी ठरतात. आता हा व्हिडीओच पाहा ना ज्यात समोर आलेला ट्रक थेट जाऊन रस्त्याच्या दुभाजकाला धडकतो यावेळी उपस्थित लोक त्याला मदत करण्याऐवजी ट्रकमधील सामान आरामात चोरी करुन नेतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “अरे अजून किती जीव घेणार?” आणखी एका मद्यधुंद अवस्थेतील एसटी चालकाचा पराक्रम; बदलापूरातील VIDEO पाहून धडकी भरेल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर laughtercolours नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोक आपली प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी लोकांच्या वागण्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर अनेकांनी हे फारच वाईट असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader