Truck Accident Video : जगण्याचा वेग वाढलाय. येथे थांबायला कोणाचा वेळ नाही. सार्यानांचा कमालीचे घाई झाली आहे. प्रत्येक रस्त्यावरील हे चित्र आता आपल्या अंगवळणी पडलंय;पण एखादा अपघात झाला असेल तर किमान थांबणे अपघातग्रस्ताला उपचार करणे एवढी तसदीही कोणी घेताना दिसत नसल्याचेही आपल्याला कानावर येते. आजच्या काळात माणूसकी पूर्णपणे नाहीशी झाल्याच्या घटना आजूबाजूला पाहायला मिळतात. हल्ली लोक इतरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात पण त्यात संधी मिळाली तर फक्त स्वत:चा फायदा बघत राहतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनेक अपघात होतात. या अपघातावेळी काहीजण मदत करण्याऐवजी चालकाचे पैसे, दागिने किंवा त्याच्या गाडीतील वस्तू चोरी करत पसार होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल की लोकं असं कशी वागू शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा