Viral video: काही व्यक्तींमध्ये जरा जास्तच उत्साह असतो. याच उत्साहाला उधाण आलं की उत्साह कधी अनाठायी धाडसामध्ये बदलून जातो ते कळतही नाही. कधी कधी काही धाडसी प्रयोग यशस्वी होतात. पण हेच प्रयोग अंगलट येऊन अगदी जीव जाईपर्यंतची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजुबाजुला बघतच असतो. दररोज जे काही अपघात होतात त्यातले २० टक्के अपघात तरी विनाकरण काहीतरी अतिधाडस केल्याने हतात. आता हेच बघा ना या ट्रक चालकाचंही असंच. ज्यामध्ये एक ट्रक ड्रायव्हर लहान आणि अरुंद पुलावरून भलामोठा ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्या खालून एक वेगवान नदी वाहत आहे.अशा पद्धतीने हिंमत करणाऱ्या लोकांची आपल्याकडे काही कमी नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्हीही श्वास रोखून धराल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. काही जणांना या ट्रक चालकाची हिंमत आवडली आहे, तर काही जणांना अशी जिवावर उदार होऊन केली जाणारी हिंमत म्हणजे मुर्खपणा वाटतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, प्रचंड मोठी नदी वाहत आहे आणि त्यावर एक पूल आहे. या पुलाची अवस्थ फारशी चांगली वाटत नाहीये. म्हणजेच कधी पुल तुटेल याचाही नेम नाही अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे. मात्र या ट्रक चालकानं असं असूनही मृत्यूच्या दारातूनच जायचं ठरवलं. एक छोटीशी चूक आणि ट्रक थेट नदीत पडेल असे वाटते.मात्र सुदैवानं कोणताही अपघात झाला नाही तर ट्रक चालकाने अतिशय आरामात आपले वाहन त्या झुलत्या पुलावरून नदीच्या पलीकडे नेले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हरियाणात रेल्वेच्या डब्यावर चढून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न, वीजवाहिनीला स्पर्श अन् क्षणात…थरारक VIDEO व्हायरल

धाडस, शौर्य आणि मूर्खपणा यांच्यामध्ये मोठा फरक आहे. पण हे अनेक लोकांना कळत नाही. त्यांचा मूर्खपणा, अतिशहान शहानपणा त्यांना कधी कुठे कसा नडतो हे त्यांच माहिती नसतं. यांच्या या मूर्खपणामुळे ते आपला जीवही धोक्यात घालतात. सोशल मीडियावर एका व्यक्तीचा असाच मूर्खपणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर crane.rasool नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.