Shocking video: सोशल मीडियावर सध्या काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी कधी असे व्हिडीओ व्हायकल होतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरता येत नाही. भांडणांचे तर अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. कधी कधी हे व्हिडीओ इतके मजेशीर असतात की हसून डसून पोटात दुखायला लागते. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो अगदी वेगळाच आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही डोक्याला हात लावाल. महिलांची अनेक वेगवेगळी भांडणं तुम्ही पाहिली असतील. महिलांना भांडण करायला कारणच लागतं, अशाच महिलांनी चक्क पार्लरमध्ये भांडणं केली आहेत. फक्त भाडंणच नाहीतरी अक्षरश: हाणामारी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलांच्या भांडणाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ फक्त बघितलेच जात नाहीत तर ते तितकेच शेअर देखील केले जातात. एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. जिथे दोन महिला आपापसात भांडताना दिसतात. हे भांडण इतकं वाढलं की महिलांनी एकमेकांचे केस पकडून एकमेकांना मारायला सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महिला चक्क पार्लरमध्ये मारामारी करत आहेत. अक्षरश: एकमेकींच्या झिंज्या उपटत दोघीही खाली पाडल्या आहेत. यावेळी आजूबाजूला असणारी लोकंही घाबरून दूर पळत आहेत. कारण त्या दोघीही इतक्या हिसंक पद्धतीनं भांडत आहेत की पाहून कुणीही मध्ये जाण्याची हिम्मत करणार नाही.

ही लढाई का आणि कोणत्या कारणासाठी झाली याची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. या भांडणाचं पुढे काय झालं, कशासाठी ही भांडणं झाली याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंटच्या माध्यमातून त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ divasandhustlas या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, “जागा बघत नाहीत, परिस्थीती बघत नाही या बायका कधीच सुधारणार नाही” तर अनेकांनी आणखी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.