Viral Video Today: असं म्हणतात की एखाद्या माणसाला मदत करा तर तो तुमचे उपकार कदाचित विसरून जाईल पण एखाद्या प्राण्याला एक वाटी पाणी जरी पाजलं तरी तो आयुष्यभर तुमची आठवण ठेवतो. वाचून कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण जेव्हा तुम्ही सध्या व्हायरल होणाऱ्या सिंहाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहाल तेव्हा तुम्हालाही हे वाक्य नक्की पटेल. इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये चक्क दोन सिंह एका महिलेला मिठी मारून भावुक झालेले दिसत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिल्याप्रमाणे हा एका प्राणी संग्रहालयातील व्हिडीओ असल्याचे समजत आहे. यामध्ये दोन सिंह महिलेला पाहताच एवढे आंनदी होतात की चक्क एखाद्या लहानग्या प्राण्यांसारखे ते उड्या मारून बागडू लागतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुम्ही व्हिडीओमध्ये बघू शकता की दोन सिंह एका महिलेला मिठी मारून तिला आपल्या जिभेने चाटत आहेत, तिला कुरवाळून तिच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत, विशेष म्हणजे ज्या जंगलाच्या राजाला पाहून भल्याभल्या धाबे दणाणतात, ज्या सिंहाचे दात तर सोडाच पण नुसतं एक नख जरी लागलं तरी कोणीही जखमी होऊ शकतं, असे एक सोडून दोन सिंह या महिलेच्या इतक्या जवळ येऊनही तिला काहीच दुखापत होईल असे वागत नाहीत हे पाहून नेटकरीही बुचकळ्यात पडले आहेत.

व्हिडिओवर लिहिलेल्या मजकुरात असे सांगितले आहे की, या महिलेने या दोन सिंहाची लहानपणापासून देखभाल केली होती. त्यानंतर वनाधिकारी त्या सिंहांना प्राणी संग्रहालयात ठेवण्यासाठी घेऊन गेले, तब्बल ७ वर्षांनी ही महिला त्या सिंहांना भेटण्यासाठी प्राणी संग्रहालयात पोहोचताच सिंह आनंदाने भावुक झाले.

त्या सिंहांनी महिलेला मिठी मारली अन…

हे ही वाचा>> Video: गर्दीच्या ट्रेनमध्ये ‘ती’ एकटी चढताच पुरुषांनी तोंडं लपवली; प्रत्येकासमोर जाऊन म्हणाली “तुला.. “

दरम्यान, इंस्टाग्रामवर अमित कुमार मोटिव्हेशनल या अकाऊंटरवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला तब्बल ४० मिलियन व्ह्यूज आहेत. जंगलाच्या राजाचे हे रूप नेटकऱ्यांना थक्क करत आहे.