Virar local fight video: मुंबईत लोकल ट्रेननं प्रवास करणं काही सोपं काम नाही. अन् त्यात जर का तुम्ही विरार लोकलनं प्रवास करत असाल तर मग काय विचारायलाच नको. कारण विरार ट्रेनला इतकी प्रचंड गर्दी असते की धड मुंगीला सुद्धा पाय ठेवायला जागा मिळत नाही. अशा स्थितीत लोकं बसण्यासाठी नाही तर चक्क उभं राहण्यासाठी सुद्धा हाणामारी करतात. मुंबईच्या लोकल ट्रेनमधील पुरुष आणि महिलांच्या डब्यात होणारी वादावादी आणि हाणामारी सर्वांनाच माहित आहे. त्यापैकी विरार लोकल या घटनांसाठी कुप्रसिद्धच म्हणावी लागेल.
मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये नेहमीच जागेच्या वादावरून भांडणं होतांना दिसतात. लोकलमधील गर्दी, चौथ्या सिटसाठी हाणामारी होत असते. गर्दीत धक्का लागल्यानं या महिलांमध्ये इतका वाद झाला की, वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. एकमेकांचे केस ओढेपर्यंत ही हाणामारी झाली.मुंबईच्या लोकल ट्रेनमधील पुरुष आणि महिलांच्या डब्यात होणारी वादावादी आणि हाणामारी सर्वांनाच माहित आहे. त्यापैकी विरार लोकल या घटनांसाठी कुप्रसिद्धच म्हणावी लागेल. महिलांच्या गुंडगिरीची अशीच घटना पुन्हा एकदा समोर आली आहे
सध्या असाच एक मंबई लोकलमधला भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये महिलांची हाणामारी आणि आक्रमकता पाहून तुम्हालाही धडकी भरेल. व्हिडीओ पाहून शेवटी तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. सुरूवातीला दोन महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. बहुदा उभं राहण्याच्या जागेवरून हे मतभेद झाले असावेत. पण पाहता पाहता हा वाद वाढला आणि मग दोघंही हाणामारी करायल्या लागल्या. आश्चर्याची बाब म्हणजे हे भांडण अक्षरश: एकमेकांना मारण्यापर्यंत गेलंय. सुरूवातीला दोघींनी एकमेकांना थोबाडीत लगावल्या. पण आसपासच्या महिलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त बघ्याच्याच भूमिकेत सर्व महिला दिसताहेत. तिथे असलेल्या एका प्रवासी महिलेने संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे.
पाहा व्हिडीओ
दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धस्स होईल. नेटकऱ्यांना ही घटना अजिबात आवडलेली नाही. त्यांनी यासंबंधीच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नोंदवल्या आहेत काही जणांच्या मते ट्रेनच्या गर्दीत होणारं लाईव्ह मनोरंजन आहे. तर काही जणं म्हणताहेत, महिला महिलांकडूनच सुरक्षित नाहीयेत, जेव्हा एखादीचा जीव जाईल तेव्हाच या शांत होतील”. तर काहींनी ही भांडणं रोखण्यासाठी प्रशासनानं उपाययोजना केल्या पाहिजे असं म्हंटलं आहे.