Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयुष्य जगण्यासाठी संघर्ष हा करावाचा लागतो. आयुष्याच्या प्रवासात अनेक वळणे येतात, अनेक चढ-उतारही येतात. इतके संघर्ष, चढ-उतरांसह आयुष्य जगायचे तरी कसे असा प्रश्न अनेकांना पडत असतो. या प्रश्नाचं खरं उत्तर तुम्हाला तेच सांगू शकतात ज्याने आयुष्याचे अनेक उन्हाळे -पावसाळे पाहिले आहे, ज्यांनी आयुष्यात संघर्ष केला आहे.
दरम्यान बसमधून प्रवास करणे आपल्या देशात सामान्य आहे. अनेकवेळा प्रवासी बसच्या मागे लटकून प्रवास करतात. अलीकडे अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून रस्ते अपघात, रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकदा हे अपघात लोकांच्या निष्काळजीपणामुळे होतात. प्रशासनाने वारंवार सुचना देऊनही लोक, वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. यामुळे अनेकदा भयंकर अपघात घडतात. आतापर्यंत लाखो लोक अशा अपघातांचे शिकार झाले आहेत.
सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण रस्त्यावरुन जाणाऱ्या टँकरच्या मागे लटकून जीवघेणा प्रवास करत आहेत. यावेळी टँकरचा वेग पाहता अपघात होण्याचीही शक्यता आहे, मात्र कधी कधी परिस्थिती अशा गोष्टी करण्यासाठी भाग पाडते असं व्हिडीओ शेअर करताना युजरने लिहलं आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ suraj.0244 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये “वाईट वेळ सांगून नाही येत पण आली की सर्वकाही शिकवून जाते” असं लिहलं आहे.या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत, मात्र, यावरुन लक्षात घेणे महत्त्वाचे आहे अशा धोकादायक प्रवासामुळे आपला जीवही जाउ शकतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने ‘दादा तुम्ही व्हिडीओ काढण्यापेक्षा मदत करायची ना” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एका युजरने हे पाहिल्यानंतर कळलं आपण किती सुखी आणि नशीबवान आहोत. असं म्हंटलंय. तर काहींनी “परिस्थिती भाग पाडते ओ नाहीतर कोण कशाला स्वत:चा जीव धोक्यात घालेल” असे म्हटले आहे.