उडुपी येथून टायर फुटल्याने थरारक अपघाताचा अंगावर काटा उभा करणारा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, जे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बिनदिक्कतपणे शेअर केले जात आहे. व्हिडिओमध्ये रस्त्याच्याकडेला असलेल्या पंक्चरच्या दुकानात एक मेकॅनिक बसचे टायर तपासताना आणि दुरुस्ती करताना दिसत आहे. टायरमध्ये हवा भरत असताना अचानक तो फुटतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टायरचा स्फोट झाल्याने मेकॅनिक हवेत फेकला गेला आणि खाली पडला, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. अब्दुल रशीद (१९) असे मेकॅनिकचे नाव आहे, तो कोटेश्वरजवळील NH66 वर असलेल्या पंक्चरच्या दुकानात टायर दुरुस्त करत होता.

हेही वाचा –मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”

हवा भरताना टायर फुटला…

अंगावर थपापार व्हिडिओ X हँडल @eedinanews ने २३ डिसेंबर रोजी पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे – उडुपी जिल्ह्यातील कुंदापूरजवळ एका पंक्चरच्या दुकानात हवा भरताना टायर फुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. कोटेश्वर येथे ही घटना घडली असून अब्दुल रशीद (१९) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.११ वाजता घडली.

हेही वाचा –चूक कोणाची? अंत्योदय एक्स्प्रेसची तोडफोड! संतप्त प्रवाशांनी ट्रेनची फोडली काच, धक्कादायक घटनेचा Video Viral

हवा भरताना टायर फुटल्याने एक माणूस हवेत फेकला गेला

हा व्हिडीओ १३ सेकंदाचा आहे, ज्यामध्ये दुकानासमोर स्कूल बस उभी असल्याचे दिसत आहे. एक तरुण बसचा टायर दुरुस्त करून त्यात हवा भरत आहे. हवा भरल्यानंतर तो तिथून दूर जाऊ लागताच टायर फुटतो. हा स्फोट इतका शक्तिशाली आहे की, धुराच्या ढगाबरोबरच ती व्यक्ती काही इंच हवेत फेकली जाते आणि जोरात जमिनीवर कोसळते. आवाज ऐकून लोक त्याच्या मदतीला धावतात आणि त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात घेऊन जातात. या अपघातात मेकॅनिकच्या हाताला दुखापत झाली आहे.​​

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video udupi man tossed in air after school bus tyre bursts during repair snk