Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच उत्तर प्रदेशातील मथुरा येथे असलेले वृंदावन बांके बिहारी मंदिरातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या मंदिरात दररोज भाविकांची गर्दी होत असते. अशा परिस्थितीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस दल आणि खासगी सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. मात्र काही वेळा सुरक्षा कर्मचारी आपली मर्यादा ओलांडतात.अशा स्थितीत दर्शनासाठी येणारे लोक संतापतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सुरक्षा कर्मचारी आणि भाविकांमध्ये हाणामारी होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही संताप येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये दर्शन मिळण्याचं सोडून गर्दीचा पूर, भाविकांचा बेशिस्त, तसेच कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळाली. उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक यांच्यामध्ये होणारा वाद ही काही नवी गोष्ट नाही. हे कार्यकर्ते भाविकांना शिस्त शिकवत असतात; मात्र दुसरीकडे ओळखीच्या लोकांना ‘वेगळा न्याय’ दिला जातो. अशा प्रकारच्या घटना प्रत्येक मंडळामध्ये पाहायला मिळतात. कार्यकर्ते हे सगळं आपल्याच हातात असल्यासारखं बेदरकारपणे वागत असतात. अशा वेळी बऱ्याचदा भाविक आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद होतात, धक्काबुक्की होते. अशातच ‘मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव’, ‘देव अशानं पावायचा नाही रं’, अशा पंक्तींची आठवण येण्याची वेळ या सुरक्षा रक्षकानं आणली आहे. देवाच्या दारात उभं राहून असं कोणी कसं वागू शकतं?, हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

मथुरेच्या वृंदावन बांके बिहारी मंदिराच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गेट क्रमांक २ वर सुरक्षा कर्मचारी भाविकांशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. जमावाला परावृत्त करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर लाठ्या-काठ्या मारू लागले. यासोबतच ते धक्काबुक्कीही करताना दिसले. दरम्यान, एक सुरक्षा कर्मचारी मुलाला जोरदार चपराक मारताना दिसत आहे. यावेळी हाणामारी इतकी वाढली की काही वेळाने हाणामारी सुरू झाली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून मंदिर परिसरात तैनात असलेले पोलिस तेथे धावले. यानंतर पोलिसांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत सुरक्षा कर्मचारी आणि भाविकांना वेगळे केले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> काय गरज होती का? मुलीला इंप्रेस करण्यासाठी स्टेजवर गेला अन् झाला मोठा पचका; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मथुरा पोलिसांनीही “या घटनेबाबत वृंदावन पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक यांना तपास व आवश्यक कार्यवाहीसाठी कळविण्यात आले आहे.” अशी एक्सवर पोस्ट करून प्रतिक्रिया दिली. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची? नेटकरीही यावर संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “मूर्तीजवळ उभे राहून स्वतःला मालक समजू नका” तर आणखी एकानं “हे फार चुकीचं आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.