UP Police viral video: सोशल मीडियावर रोज नवीन वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ पाहून हसायला येतं; तर काही व्हिडीओ पाहून हसावं की रडावं हेच कळत नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, ज्या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असते, तिथे बऱ्याचदा पोलीस प्रेमी युगुलांना पकडतात आणि नियम तोडले असतील, तर कारवाई करतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे. यूपीमध्ये पोलिसांनी भाऊ-बहिणीला गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड समजून रस्त्यावर चक्क मारहाण केलीय. ऐकूनच धक्का बसला ना… याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

उत्तर प्रदेशातील पोलिसांचा भोंगळ कारभार सोशल मीडियामुळे समोर आला आहे. पोलिसांनी रस्त्यावरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड समजत मारलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तरुणाला पोलीस ठाण्यामध्ये नेलं. रस्त्यावर जेव्हा हा गोंधळ सुरू होता तेव्हा तेथील एका व्यक्तीनं हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही तरुणी हा मुलगा तरुणीचा बॉयफ्रेंड नसून भाऊ असल्याचं सांगत आहे; पण पोलिस काही तिचं ऐकायला तयार नव्हते. हे प्रकरण रायबरेलीच्या सलोन भागातील आहे. भाऊ-बहीण कुठेतरी जात असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, साध्या गणवेशातील पोलिस कर्मचाऱ्याशी त्यांचा काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर पोलिस शिपायाने भाऊ आणि बहिणीला मारहाण केली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोघांमध्ये वाद सुरू असून, एक व्यक्ती त्या मुलाची मान धरून उभी आहे. इथपर्यंत तर ठीक आहे; मात्र पुढे पोलिसांनी दोघांना २४ तास बेकायदा कोठडीत ठेवलं.

youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…
Shocking video truck accident video instead of helping him some people started lotting his mobile money
माणुसकी मेली..! अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर वेदनेनं ओरडत होता अन् लोकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
Bigg Boss Marathi Dhananjay Powar & ankita Walawalkar
Video : “जेव्हा आपली बहीण खरेदी करते…”, धनंजय पोवारचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत! कमेंट्समध्ये अंकिताने केली पोलखोल
Jitendra Awhad, Filming by police , Jitendra Awhad house, police at Jitendra Awhad house, Jitendra Awhad latest news,
VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये युजरने, “सिव्हिल ड्रेसमध्ये उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यानं भाऊ आणि बहिणीला प्रियकर आणि प्रेयसी म्हणत मारहाण केली आणि त्यांना २४ तास बेकायदा कोठडीत ठेवलं.” बहीण विनवणी करीत राहिली आणि जरी ते प्रियकर-प्रेयसी असले तरी पोलिसांना काय अडचण आहे, असा सवाल विचारला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरांतून यूपी पोलिसांवर टीका होत आहे. त्यानंतर प्रशासनाकडून या पोलिसांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @greenteamIndia नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Story img Loader