Shocking Video Viral : तुम्ही अनेकदा लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर लोक नाचताना पाहिले असतील, पण तुम्ही कधी एखाद्याच्या अंत्ययात्रेत डीजे लावून लोक नाचताना पाहिले आहेत का? तुम्हाला हे वाचून हसू येईल, पण एका अंत्ययात्रेत खरोखरच असा प्रकार घडला आहे, ज्यात अंत्ययात्रेदरम्यान लोक डीजेच्या तालावर चक्क नाचताना दिसतायत. अनेकांना हा व्हिडीओ पाहून अरे ही वरात आहे की अंत्ययात्रा असा प्रश्न पडलाय. सध्या या अनोख्या अंत्ययात्रेची परिसरात जोरदार चर्चा रंगताना दिसतेय.
थाटामाटात निघाली अंत्ययात्रा
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका अंत्ययात्रेदरम्यान लोक नाचताना आणि गाताना दिसतायत. यावेळी डीजेवर मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात आहेत. भोजपुरी गाण्यांवर लोक नाचताना दिसतायत. तुम्ही पाहू शकता की, मृतदेह चार खांद्यांवर घेऊन जाणारे लोकही डीजेच्या तालावर नाचताना दिसत आहेत. अगदी थाटामाटात ही अंत्ययात्रा निघाली आहे. एखाद्या लग्नाच्या वरातीसारख्या माहोलमध्ये ही अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत पोहचली. यावर अनेकांनी असा दावा केला की, ही घटना बिहारमधील असावी.
बिहारमध्ये अनेक वृद्धांच्या मृत्यूनंतर अशा प्रकारची व्यवस्था केली जाते. एखाद्या व्यक्तीची अंत्ययात्रा उत्सवासारखी साजरी केली जाते. मृत्यूनंतर शेवटचा प्रवास संस्मरणीय बनवण्यासाठी असा कार्यक्रम आयोजित केला जातो. अनेकांची शेवटची इच्छा असते की, त्यांच्या अंत्ययात्रेवेळी दु:खाचे नाही तर आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असावे, मृत्यूनंतर निरोप देताना कोणीही रडू नये तर आनंदाने निरोप द्यावा, म्हणून त्यांचे कुटुंबीय अशाप्रकारे आनंदाने निरोप देताना दिसतात.

या अनोख्या अंत्ययात्रेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यावर लोकही भरभरून कमेंट्स करताना दिसतायत. एका युजरने लिहिले की, “मृत्यूला उत्सवासारखे साजरे करणे ही बिहारची परंपरा आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “हे खूपच अति झालं. लोकांना एखाद्याच्या मृत्यूचे दुःख कमी वाटते, उलट ते अंत्ययात्रेवेळी उत्साहात दिसतात.”