Shocking Video Viral : गेल्या अनेक वर्षांपासून वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंड बदलताना दिसतोय. पूर्वी वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे डेकोरेशन केले जायचे. पण, आता फुग्यांच्या फॅन्सी डेकोरेशनला विशेष महत्त्व दिले जाते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणाचाही वाढदिवस असला तरी थीमनुसार फुग्यांचे डेकोरेशन केलं जातं. या डेकोरेशनमधील विविध रंगांचे हायड्रोजनचे फुगे आकर्षणाचा विषय असतो. पण, फुग्यांच्या याच सजावटीमुळे वाढदिवसाच्या दिवशी एका तरुणीबरोबर एक भयंकर घटना घडली आहे, जी पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर सध्या या तरुणीच्या वाढदिवस सेलिब्रेशनचा भयानक व्हिडीओ व्हायरल होतोय.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका तरुणीच्या वाढदिवसानिमित्त विविध रंगीबेरंगी फुग्यांची सजावट करण्यात आलीय. ही सजावट पाहून ती तरुणीही खूश होते. पण, पुढच्याच क्षणी तिच्याबरोबर अशी काही घटना घडते की पाहून तुमच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक तरुणी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत एका हातात फुगे आणि दुसऱ्या हातात केक घेऊन उभी आहे. ती फोटोसाठी वेगवेगळ्या पोझ देतेय. यावेळी जशी ती केकजवळ हायड्रोजन असलेले फुगे घेऊन जाते, तेव्हा अवघ्या काही सेंकदात एक मोठा स्फोट होतो. स्फोट इतका भयानक असतो की यात तरुणीलाही गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यता आहे. अचानक काय घडलं हे तिलाही न समजल्याने बिथरलेल्या अवस्थेत ती हातातून केक खाली फेकते आणि किंचाळत दूर पळून जाते.

ही घटना १४ फेब्रुवारी २०२५ रोजी व्हिएतनामच्या हनोई प्रांतातील असल्याचे सांगितले जातेय, ज्यात एका तरुणीने तिच्या वाढदिवसानिमित्त एका रेस्तराँमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी पार्टीत केक कापत असताना तिच्या हातातील फुगा केकवरील मेणबत्तीच्या संपर्कात येतो आणि त्याचा भयंकर स्फोट होतो. फुग्यातील हायड्रोजनमुळे हा स्फोट झाल्याचे सांगितले जाते. या घटनेत तरुणीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा व्हिडीओ @thaimusiccover नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यावर विविध कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “खूपच वाईट झालं”, दुसऱ्याने लिहिले की, “आता प्रत्येक जण काळजी घेईल.” तिसऱ्याने लिहिले की, “बापरे…”.

Story img Loader