Shocking Video Viral: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असताना आपण पाहतो. या व्हायरल झालेल्या व्हिडीओंमुळे स्वत:ला रील स्टार किंवा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणवणाऱ्या काही लोकांचं जरा जास्तच फावलं आहे, असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. या व्हिडीओंमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा लोक गैरवापर करू लागले आहेत.

काही लाइक्स आणि व्ह्युजसाठी हे रील स्टार काहीही करून आता हद्द पार करू लागले आहेत. यात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता फक्त प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. सध्या अशा प्रकारचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात एक महिला किचनजवळ रील करण्यासाठी जाते आणि अचानक भयंकर घटना घडते. नेमकं काय घडतं, जाणून घ्या…

महिलेचा प्रताप पडला भारी (Woman’s Dupatta Caught Fire)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक महिला किचनच्या प्लॅटफॉर्मवर बसून रील करण्याचा प्रयत्न करत होती, यासाठी तिने गॅसही पेटवला होता. मोबाईलमध्ये व्हिडीओ सुरू करण्यासाठी जसा तिने हात पुढे केला, तशी तिची ओढणी त्या गॅसमध्ये गेली आणि ओढणीने पेट घेतला. तिला हे कळताच ती लगेच खाली उतरली. यापुढे नेमकं काय घडलं याची माहिती अजूनही समोर आलेली नाही.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारा हा व्हिडीओ @_sapana_singh88 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ४.६ मिलियन व्ह्युज आले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ही स्वत:ला जाळून घेईल आणि नंतर तिच्या सासरच्या लोकांना यात अडकवेल.” तर दुसऱ्याने, “अजून बनवा रील्स, अशा रील्स करून व्हायरल व्हाल पण यामुळे जीवही वाचणार नाही, लक्षात ठेवा” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “किचनच्या प्लॅटफॉर्मवर चढून जेवण बनवत रील कोण काढतं?”