Shocking Viral Video : सोशल मीडियावर वन्यप्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओंत हे प्राणी जंगलात फिरताना आणि शिकार करताना दिसतात. तर, काहींमध्ये प्राणिसंग्रहालयात प्राण्यांची मस्ती बघायला मिळते. इतकेच नाही, तर काही व्हिडीओ हे असे असतात की, ते पाहून धक्का बसतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

व्हिडीओमध्ये दोन तरुण एका खोलीत त्यांच्या बेडवर आरामात झोपलेले दिसत आहेत. खोलीची खिडकी उघडी आहे. यावेळी खिडकीतून अचानक एक काळा बिबट्या वेगाने धावत आला आणि त्याने बेडवर उडी मारली. खोलीच्या आत खिडक्यांना पडदे होते. त्यामुळे तरुण वाचले. कारण- बिबट्या पडद्यांमध्ये अडकला आणि तो बेडच्या कडेला जाऊन पडला, पडद्यामध्ये तोंड वगैरे गुंडाळले गेल्याने त्याला हालचाल करता येत नव्हती.

धक्कादायक बाब म्हणजे बिबट्याने बेडवर उडी मारताच ते तरुण घाबरून जाण्याऐवजी चक्क मोठ-मोठ्याने हसत होते. त्यांना बिबट्या पडद्यात अडकला हे पाहूनच खूप आनंद झाला होता, त्यावर अनेकांनी अंदाज बांधला की, तो बिबट्या पाळीव आहे. पण त्याने ज्या प्रकारे तरुणांच्या अंगावर झेप घेतली ते पाहून कोणालाही भीती वाटली असती.

अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ @odesskiy_shuher नावाच्या इन्स्टाग्राम युजरने पोस्ट केला आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट्स करून आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले की, हा कोणता प्राणी आहे? दुसऱ्या युजरने लिहिले की, हा प्युमा आहे. चौथ्याने लिहिले की, या प्राण्याकडे पाहून तो त्यांच्या पाळीव प्राण्यासारखा वाटतोय. म्हणून त्याने काहीही केले नाही.