Shocking video viral : सध्या महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कहर वाढताना दिसतोय. अनेक ठिकाणी लोकांनी घराबाहेर जाणं बंद केलं आहे. मनुष्याप्रमाणे प्राणीही थंडीमुळै हैराण झाले आहेत. सध्या सोशल मीडियावरही थंडीच्या तडाख्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. यामध्ये एका व्यक्तीने थंडीपासून वाचण्यासाठी भररस्त्यात असे काही जीवघेणे कृत्य केलं की ज्यामुळे त्यासह इतरांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकला असता.
तुम्ही पाहिलं असेल हिवाळ्याच्या दिवसांत लोक कडक थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवून आपला बचाव करतात. पण, या व्हिडीओत एका काकांनी थंडीपासून वाचण्यासाठी चक्क एका सिलिंडरलाच आग लावली आणि शेकोटी घेतली, यावेळी त्यांच्यामागे पेट्रोलने भरलेल्या काही बाटल्यादेखील ठेवल्या होत्या. यावेळी चुकूनही एखादी अभद्र घटना घडली असती तर त्यात काकांना आपला जीव गमवावा लागला असता.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक काका खुर्चीवर बसलेले दिसतायत. यावेळी त्यांच्यासमोर गॅस सिलिंडर ठेवला आहे, ज्याच्या नोझलमधून येणाऱ्या गॅसला आग लावून त्यावर काका शेकोटी घेतायत. हे जीवघेणे कृत्य करताना ते एका व्यक्तीशीदेखील बोलतायत. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या मागे पेट्रोलने भरलेल्या बाटल्या ठेवल्यात. जर चुकूनही आगीने मोठा पेट घेतला असता तर काकांसह तिथले लोकही त्यात होरपळले असते. त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी काकांनी केलेला हा जीवघेणा प्रकार पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हा धक्कादायक व्हिडीओ @farhan_siddiqi_15 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकांनी कमेंट्स करत आपलं मत व्यक्त केलं आहे. एका युजरने लिहिले की, “भाई हे बिहार आहे, इथे काहीही होऊ शकते.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “काकांची रोज यमराजाबरोबर उठ-बस आहे वाटतं.” तिसऱ्याने लिहिले की, “असे लोक स्वत:बरोबर १०-१५ जणांना एकत्र घेऊन जातात.”