Viral video: सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात. या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात. काही पर्यटक तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात. पण, असे साहस काही वेळा पर्यटकांच्या चांगलेच जीवावर बेतते. अशा घटना पाहता वारंवार सांगितले जाते की, पाण्याशी कधी खेळू नका. तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता, धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. अशाच पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या पर्यटकांचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. लोणावळा भूशी डॅम, ताम्हिणी घाटातील दुर्घटनेनंतर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

अवघ्या ५ सेंकदात मृत्यूनं गाठलं

Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Loksatta bookmark My Father Brain A Life in the Shadow of Alzheimer Sandeep Johar
बुकमार्क: विस्मृतीच्या अंधारातील धडपड…
bus mini truck accident in hathras
हाथरसमध्ये बस-मिनी ट्रकच्या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू, तेराव्याच्या कार्याहून येताना घडली दुर्घटना
Loksatta anvyarth Manipur two bomb attacks Anti drone system activated
अन्वयार्थ: चर्चा हाच पर्याय हे आता तरी पटले?
The migration in 2022, supported by airborne foster parents.
नामशेष होत चाललेले पक्षी, हरवलेले स्थलांतराचे मार्ग आणि विमानातून मार्गदर्शन; संवर्धनतज्ज्ञ नेमके काय करत आहेत?
leopard attacks in shirur woman dies in leopard attacks in Jambut
शिरुरमध्ये बिबट्यांचे हल्ले; जांबूतमध्ये महिलेचा मृत्यू, कान्हूर मेसाई गावात एकजण जखमी
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण

अनेक कुटुंब आपल्या लहान मुलांसह धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. व्हिडीओच्या सुरुवातीला अनेक नागरिक येथे मजामस्ती करताना दिसत आहेत. हे एक संपूर्ण कुटुंबच असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, काही वेळानंतर येथील चित्रच पालटलं. अवघ्या पाच सेकंदात अचानक पाण्याचा वेग आणि पातळी वाढल्यानंतर पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली. धबधब्याचा वाढलेला वेग पाहून नागरिकांना बाजूला होण्यास सांगण्यात आलं. मात्र, यामध्ये फक्त एकच व्यक्ती चलाखीने पटकन बाहेर आली, तर बाकी सगळे बाहेर येण्याच्या आधीच पाण्यानं रौद्ररुप धारण केलं. पाण्याचा वेग इतका वाढला की, अक्षरश: सहा ते सात जण यामध्ये वाहून गेले. व्हिडीओ पाहून पाण्याशी खेळणे कसे जीवावर बेतू शकते याची कल्पना येईल. पर्यटकांचा हा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अवघ्या काही सेकंदांत वाहून गेले

अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडीओत काही पर्यटक पाण्यात आनंद घेताना दिसत आहेत. यावेळी अचानक पाण्याचा मोठा झोत येतो आणि काही पर्यटकांना प्रवाहाबरोबर घेऊन जातो. हे सर्व काही इतक्या अचानक घडलंय की, लोकांना काही समजलेच नाही. या थरकाप उडवणाऱ्या घटनेत लोक आपला जीव वाचवण्यासाठी कसे आरडाओरडा करतायत हे दिसतेय. दरम्यान ही घटना कुठे घडली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रायगडानंतर आता हरिश्चंद्रगडाचा VIDEO समोर; ट्रेकींगचा प्लॅन करत असाल तर थांबा, आधी ‘हे’ पाहा

या भीषण घटनेचा व्हिडीओ id_ya_mathiten_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेय, “अनेकदा इशारा देऊनही लोक पाण्याखाली जातात आणि अंघोळ करतात. त्याचाच परिणाम म्हणजे हा अपघात आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “निसर्गाशी खेळ करू नये.”