Wedding Dance Shocking Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि तितकाच आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे लग्नातील प्रत्येक विधी, कार्यक्रम खास करण्यासाठी प्रत्येकाची घाई गडबड सुरू असते. लग्न म्हटलं की वरात आलीच. वरातीला बँडबाजांच्या तालावर नाचण्याचा एक वेगळा आनंद असतो. खास करून लग्नघरातील मंडळींना यावेळी मनसोक्त नाचता येते. पण, अनेकदा वरातीत अशा काही घटना घडतात की त्या पाहून धक्काच बसतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नाच्या वरातीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण असं काही जीवघेणं कृत्य करतोय की पाहून पाहुणे मंडळीदेखील घाबरून जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेत. तरुणाचे ते कृत्य पाहून सर्वच बिथरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओतील लग्नाच्या वरातीत एक तरुण गवताच्या पेंढीला आग लावतो आणि नंतर तो ती पेंढी उचलून नाचू लागतो. यानंतर तो असं काही करू लागतो की, उपस्थित पाहुणे मंडळी वरात सोडून दूर पळू लागतात. त्याच्या अशा कृत्यामुळे वरातीत एकच गोंधळ पाहायला मिळतो.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर वाजत गाजत लग्नाची वरात जातेय. वरातीत पाहुणे मंडळी आनंदाने नाचतायत. यावेळी नाचता-नाचता एक तरुण हातात गवताची मोठी पेंढ उचलतो आणि तिला आग लावतो. यानंतर आगीची जळती पेंढी उचलून नाचू लागतो. इतकंच नाही तर ती पेंढी जोरजोरात गरगर फिरवू लागतो, ज्यामुळे आजूबाजूला आगीच्या ठिणग्या पसरू लागतात. तरुणाचा आगीशी सुरू असलेला हा खेळ पाहून वरातीत नाचणारे पाहुणे मंडळी घाबरतात आणि जीव वाचवण्यासाठी दूर पळू लागतात. यावेळी पळताना काही जण खाली कोसळतानादेखील दिसतायत. तरुणाच्या या जीवघेण्या कृत्यामुळे उत्साहाचे वातावरण अचानक भीतीत बदलते.

वरातीचा हा धक्कादायक व्हिडीओ @Your_memer नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी कमेंट करत तरुणाचे कृत्य फारच धोकादायक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने म्हटले की, “ही लग्नाची मिरवणूक नाही तर येथे मृत्यूचा तांडव सुरू आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “असे दिसते की मुलगा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात गेला होता.” तिसऱ्याने लिहिलेय की, “वराचे वडील मनातल्या मनात शिव्या देत असतील, ते म्हणत असतील की, ह्याला लग्नात नेमकं बोलावलं कोणी असेल.”