Woman booked for assaulting father-in-law: सून आणि सासऱ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेनं तिच्या ८७ वर्षीय सासऱ्याला काठीने मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सासू आणि सूनेचं नातं हे बाप-लेकीसारखं असतं असं सगळेच म्हणतात मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण आपल्याच वृद्ध सासऱ्यांना ही महिला अमानुषपणे मारहाण करत आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली आहे.

देशात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशात महिलांवरील अत्याचार वारंवार समोर येत असतात. पण सध्या अशी घटना समोर आली ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सुनेला सासूकडून मारहाण होताना आपण पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. पण एका गावात सुनेनं क्रूरतेचा कळस गाठत आपल्या आजारी सासऱ्यांना मारहाण केलीय.

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Shocking video Husband took VRS due to wife's illness, wife died on the day of retirement
“नियतीचा खेळ” पत्नीच्या आजारपणामुळे लवकर रिटायरमेंट घेतली, पण निरोप समारंभातच तिने साथ सोडली; VIDEO पाहून धक्का बसेल
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क

आपल्याला अगदी लहानपणापासून शिकवलं जातं, की मोठ्यांचा आदर करावा. त्यांच्याशी प्रेमाने वागावं. मात्र, अनेकदा माणूस सगळ्या मर्यादा ओलांडून असं काही करतो जे सगळ्यांनाच हादरवून टाकतं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सासरे आजारी असल्यामुळे बेडवर झोपले आहेत. यावेळी तिथे सून येते आणि अचानक त्यांना मारू लागते. कधी तोंडावर चापट मारते कधी कानाखाली मारते तर कधी तिच्या हातातलं ताट त्यांच्या डोक्यात मारते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अत्याचाराची ही घटना कैद झाली आहे. सुनेची ही मारहाण इतकी आमानुष होती की या घटनेनं सगळ्यांनाच हादरवून टाकलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>ती पोहत होती अन् अचानक शार्क माशानं पाय पकडला; रक्तस्त्राव आरडाओरडा अन्…पाहून तुमचाही थरकाप उडेल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mukesh_kumar_yadav_mukesh_kuma नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलं “हे कर्म तुझ्या वाट्याला फिरुन येणार…” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “म्हातारी माणसं ही लहान मुलं असतात त्यांना समजून घेतलं पाहिजे”

Story img Loader