सध्या सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये दिवसाढवळ्या रस्त्यावर एक महिला विवस्त्र होऊन फिरताना दिसत आहे. रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरू असताना महिला रस्त्यावर फिरताना दिसत आहे. हा व्हिडीओ मोहन नगर पोलीस स्टेशन साहिबााबाद भागातील आहे. बुधवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहन नगर चौक हा गाझियाबादचा सर्वात वर्दळीचा चौक आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीसीपी ट्रान्स हिंडन यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक्सवर @hariomydvAu1000 नावाच्या खात्यावरून हा व्हायरल व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ गाझियाबादमधील असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. धक्कादायक व्हिडिओमध्ये गाझियाबादमधील मोहन नगर चौराहा येथील एका रहदारीच्या रस्त्यावर एक महिला कपड्यांशिवाय फिरताना दिसत आहे. कोणीही महिलेच्या वर्तणूकीवर आक्षेप घेताना दिसत नाही, तिला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा तिला कपडेही देऊ करत नाही. जेव्हा ती रस्त्यावरून फिरत होती, तेव्हा त्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ पहायला मिळत आहे. व्हिडिओ रात्रीच्या वेळी प्रतीत होत आहे.

हेही वाचा – हद्द झाली राव! महागड्या रेस्टॉरंटमध्ये फुकट जेवण मिळवण्यासाठी जोडप्याने केले हे कृत्य, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं

वृत्तानुसार, हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी २५ जून रोजी शूट करण्यात आला होता. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. ही महिला कोण आहे आणि ती रस्त्यावर का विवस्त्र अवस्थेत का फिरत होती हे देखील स्पष्ट झालेले नाही. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा – सहा सिंहाच्या तावडीत सापडला एकटा झेब्रा, एकापोठापाठ एक सिंह मारत होता झडप तरी…. Viral Videoमध्ये पाहा थरारक शिकार!

घटनेच्या दोन दिवसांनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हाच अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे.
या घटनेमुळे राज्यातील विशेषत: गाझियाबादमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करणे आणि तिचा सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शक्य तितक्या लवकर महिलेचा शोध घेणे अत्यावश्यक ठरत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video woman seen walking naked on busy street in broad daylight in ghaziabad viral clip prompts snk