Woman Cross The River With Bike: उत्तर भारतात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. याने अनेक लोकांचे हाल झाले आहेत. शहरात लोक आपापल्या वाहनाने घरापर्यंत पोहोचतात, मात्र हा पाऊस खेड्यापाड्यातील दूरवर राहणाऱ्या लोकांसाठी आपत्ती ठरला आहे. अनेक गावांमध्ये लोकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना घरे देखील सोडावी लागली आहेत. गावातील अशी अनेक चित्रे आली, जी पाहून तुम्ही विचारात पडाल. त्यातील एका व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. पुरामुळे पूल तुडुंब भरला आणि तो पार करण्यासाठी काही लोकांनी अप्रतिम जुगाड शोधला आहे.

दुचाकी खांद्यावर ठेवली आणि महिलेला पलीकडे नेले

राजस्थानमधील बारनमधील कसबथाना परिसरात गेल्या ४ दिवसांपासून पाऊस पडत आहे, त्यामुळे या भागातील नदी-नाले तुंबताना दिसत आहेत. या समस्येमुळे अनेक रस्ते ठप्प झाले असून, लोकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. मात्र, या परिसरात एक विलक्षण नजारा पाहायला मिळाला. जास्त पावसामुळे एका पुलावरून पाणी वाहू लागले, मात्र एका महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी काहींनी जीव पणाला लावला. काही लोक चरखडी गावाकडे निघाले होते, त्या वाटेत एक महिलाही अडकली. मग गावातील लोकांनी नदी पार करण्यासाठी अप्रतिम मार्ग स्वीकारला.

( हे ही वाचा: या वर्षी भारतावर येणार मोठे संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने वाढवली चिंता)

( हे ही वाचा: दंगल गर्ल गीता फोगटने खरेदी केली महिंद्रा स्कॉर्पिओ-एन कार; आनंद महिंद्रा म्हणाले, “आमच्यासाठी तर हा…”)

गावातील लोकांनी अशी काही मदत केली

चरखडी नदीला पूर आल्यानंतर रस्ता ठप्प झाला होता. तेव्हा काही जणांनी महिलेला खांद्यावर ठेवलेल्या दुचाकीवर बसवून नदीचा पूल पार केला. गावातील रहिवासी संजीव यादव यांनी याबाबत सांगितले की, पाथरी गावात राहणाऱ्या एका दाम्पत्याला दुचाकीने चरखडी गावात जायचे होते. अशा स्थितीत नदीच्या पुलावर दोन फुटांपेक्षा जास्त पाण्याचा पत्रा वाहत होता. या जोडप्यालाही दुचाकीसह नदी पार करावी लागली, त्यामुळे ग्रामीण तरुणांनी बांधावरची दुचाकी उचलून महिलेला तिच्यावर बसवले, पूल पार करून गावात पोहोचले.