Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोर हा चोर असतो मग तो पुरुष असो वा स्त्री. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक दुकानदार त्याच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना कपडे दाखवत असल्याचं दिसून येतं. या ग्राहकांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. दुकानदार कपडे काढण्यासाठी मागे वळताच एक महिला दुकानात समोर ठेवलेली पँट काढते आणि शेजारी उभ्या असलेल्या महिलेला देते, त्यानंतर ती बाई पँट गुपचूप एका लहान मुलीला देते, मुलगी ती पँट लपवते. यानंतर ते सर्वजण दुकानातून निघून जातात. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
चोरीची घटना कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि आत्ताच सावध व्हा.
पाहा व्हिडीओ
ह
सोशल मीडियावर be_harami नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत २.१ दशलक्षाहून अधिक वेळा पाहण्यात आले. तर, अनेकांनी व्हिडिओला लाईक केले. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने म्हटले आहे की “संपूर्ण कुटुंबच चोर” दुसऱ्या युजरने लिहिले… व्वा, काय चोर आहे ती, ती पूर्ण नियोजन करून आली आहे आणि दुकानदारही तिला साथ देत आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले… दुकानदार इतका बेफिकीर आहे, चोरी होणारच होती. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…सावध रहा, सतर्क रहा.