Shocking video: सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात ज्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होतात की, हसावे-रडावे काही कळत नाही. तसेच सध्या अलीकडे लोकांनी परील बणवण्याचे, सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागले आहे. काही लाइक्स आणि व्ह्युजसाठी हे रील स्टार किळसवाणा प्रकार करून आता हद्द पार करू लागले आहेत. अशा प्रकारचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जिथे एक तरुणी गेट ऑफ इंडिया मुंबई येथे चक्क तोकड्या कपड्यांमध्ये टॉवेलमध्ये रील बनवताना दिसतेय.

तरुणीचा अश्लील डान्स व्हायरल

सोशल मीडियावरून मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी लोक आता हद्दच पार करू लागले आहेत. काही लाईक्स आणि व्ह्युजसाठी स्वत:ला इन्फ्लुएन्सर म्हणवणारे काही लोक मर्यादा ओलांडत आहेत. सोशल मीडियावर रील्स करून व्हायरल होण्याची नशा आजकालच्या पिढीतल्या काहींना लागली आहे. या व्हायरल व्हिडीओंचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय.अगदी रेल्वेस्थानकावर, मेट्रोत, मैदानात, सार्वजनिक ठिकाणी मिळेल त्या जागेवर हे रीलस्टार व्हिडीओ शूट करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुणी चक्क ब्रा आणि टॉवेल लावून गेट ऑफ इंडिया मुंबई येथे फिरतेय. तरुणीचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही संतप्त व्हाल. या व्हिडीओमध्ये महिलेने प्रसिद्धी मिळवण्यासाठी हद्दच पार केली आहे.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथे पर्यटकांची गर्दी दिसत आहे. या गर्दीत अचानक एक तरुणी येते आणि नाचू लागते. विचित्र हावभाव करत ती डान्स करताना दिसत आहे. तसेच तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे लोकंही तिच्याकडे वांरवार बघत आहे. तिनं चक्क ब्रा आणि खाली ओढणी किंवा टॉवेलसारखा कपडा गुंडाळलेला दिसत आहे.  तिथे असलेल्या लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि फक्त काही लाईक्स आणि व्ह्युजसाठी ती हे सगळं करत असल्याचं दिसतंय. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ

अनेकदा लोक आपला जीव धोक्यात देखील घालतात. तर अनेकदा अश्लील कृत्य करायला मागे-पुढे पाहात नाहीत. सध्या असाच एक तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. कारण या तरूणीने टॉवेल गुंडाळून असे काही केले आहे की, लोकत तिला पाहतच राहिले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर काहींनी संताप व्यक्त केला आहे.

Story img Loader