Youth Attempts Suicide : आजची तरुण पिढी काही अडचणी आल्या की ते थेट आत्महत्येचं पाऊल उचलतात. मग विष पिऊन आत्महत्या करणे, गळफास लावून घेणे, रेल्वेखाली उडी मारणे अशा घटना आपण पाहिल्या आहेत. त्यात अजून एका घटनेची भर पडली आहे. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचा खजिना आहे. रोज इथे हजारो व्हिडीओ पाहिला मिळतात आणि ते व्हायरल होतात. सध्या अशाच एका व्हिडीओची चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आत्महत्या करत असल्याचे दिसतंय. हरयाणाच्या अंबाला रेल्वे स्थानकावर एका तरुणाने ओव्हर हेड खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आत्महत्येच्या निर्धाराने एक युवक रेल्वेडब्याच्या छतावर चढला. संभाव्य धोका ओळखून प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. यामुळे तिथे असणारे रेल्वे कर्मचारी, पोलिस, आरपीएफ जवानांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी लागलीच नियंत्रण कक्षाला धोक्याची सूचना दिली. त्याचवेळी युवक गाडीच्या डब्यावर चढलाच. त्यानंतर जे घडलं ते बघून उपस्थितांच्या अंगावर काटा आला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुण ट्रेनच्या डब्यावर चढला आणि खांबाला लटकत असताना हाय व्होल्टेज ओव्हरहेड वायरला स्पर्श केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.या तारेतून वीजपुरवठा सुरू असल्यानं पी. सूर्याचा विजेच्या धक्क्यानं जळून जागीच खाली पडला. यानंतर रेल्वेच्या डब्याच्या छतालाही आग लागली होती.या घटनेचे प्रेक्षकांनी रेकॉर्डिंग केले असून या घटनेचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
https://twitter.com/lavelybakshi/status/1767861110693388495
हेही वाचा >> OMG! असा स्टंट कोण मारतं? तरुणानं हजारो फुटांवरून मारली उडी, अन् मग…श्वास रोखून धरणारा Video
रोहित असे जखमी तरुणाचे नाव असून तो छत्तीसगडमधील जांजगीर जिल्ह्यातील चंपा गावात राहत होता. विजेचा धक्का लागल्याने रोहित रुळावर पडल्यानंतर घटनास्थळी उपस्थित आरपीएफ जवानांनी डॉक्टरांना बोलावले. त्यानंतर त्याला उपचारासाठी छावणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रोहितची प्रकृती आणखी खालावल्याने त्याला पीजीआय चंदिगडमध्ये भरती करण्यात आले आहे. जगभरात आत्महत्या हा एक गंभीर प्रश्न आहे.देशात दरवर्षी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत असून त्यात तरूणांचे प्रमाण अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.