Viral video: माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बढाया मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्‍व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधीतरी त्या गर्वाचे घर खाली होते आणि निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर अनेकदा येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्यापुढे मानवाचे काही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. तरीही काही जण निसर्गाला आव्हान देतात. मात्र, तुमची एक चूक तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते याचीच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे, यासंबंधीचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंगराच्या कड्यावर अडकले तीन मित्र

आयुष्यात काहीतरी थ्रिल हवं, यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. काही लोक अ‍ॅडव्हेंचरसाठी आपला जीव धोक्यात घालतात, तर काही लोक थ्रिलच्या नादात आपला जीव गमावून बसतात. आता अशीच काहीशी धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामध्ये तीन मित्र डोंगराच्या कड्यावर अडकले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पावसाळ्यात अशा ठिकाणी जाण्याआधी १०० वेळा विचार कराल.

निसर्गातील एक चूक अन् खेळ खल्लास

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन तरुण एका डोंगराच्या कड्यावर गेले आहेत. या कड्यावर एका पावलाएवढंही अंतर नाहीये. त्या ठिकाणी थोडीशी जरी चूक झाली तरी त्या तीन तरुणांचा जीव जाऊ शकतो. मात्र, हे तरुण जीवाची पर्वा न करता, त्या ठिकाणी पोहोचले आणि अडकले. तेथे एकाचा जरी पाय घसरला तरी हे तीनही तरुण खाली दरीत कोसळू शकतात अशी परिस्थिती या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे तीनही तरुण कॉलजचे विद्यार्थी दिसत आहेत. त्यांच्या खांद्यावर बॅग दिसत असून, तीनही तरुण डोंगराच्या कड्यावर एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पोटात गोळा येईल. व्हिडीओ नक्की कुठला आहे हे अद्याप समजलेले नाही; पण हा व्हिडीओ महाराष्ट्रातीलच एका किल्ल्यावरचा असल्याचा अंदाज आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वसईच्या तुंगारेश्वरमध्ये लोणावळ्याची पुनरावृत्ती; दोन तरुण एक दोरी आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह; रेस्क्यूचा थरारक VIDEO व्हायरल

इन्स्टाग्रामवर __rahul_ly_143 नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘तुमची निसर्गातील एक चूक तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.’ त्यावर नेटकऱ्यांनी अनेक संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “कोणीही यमराजांच्या कामात अडचण आणू नये.” “या लोकांना तिकडं जायची गरजच काय; पण?” अशा या प्रतिक्रिया आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video youth doing stunt in hills and valleys video goes viral on social media srk
Show comments