Shocking Viral Video : सोशल मीडियावर अपघात, मारहाण, खून अशा अनेक क्रूरतेच्या घटनांचेही भयानक व्हिडीओ व्हायरल होत असतात; जे पाहिल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते. कारण- त्यात एखाद्या व्यक्तीवर इतक्या वाईट प्रकारे अन्याय केला जात असतो की, पाहतानाही संताप येतो. अनेकदा व्हिडीओतील दृश्याने भीतीने मन सुन्न होते. सध्या अशाच एका भयानक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका वयोवृद्धाला एक व्यक्ती स्कूटरला मागे बांधून फरपटत नेताना दिसतेय. त्याची ही क्रूरता पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वयोवृद्धाला स्कुटीला बांधून नेलं फरपटत
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जण एका वृद्ध व्यक्तीला त्याच्या स्कूटरच्या मागे बांधून वेगाने फरपटत नेताना दिसत आहे. या निर्दयी व्यक्तीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे त्यातून दिसत आहे. वृद्धाला स्कूटरला बांधून फरपटत नेताना त्याने रस्त्यावरील खड्डे, दुभाजक यांच्याकडेही दुर्लक्ष केले आहे; ज्यामुळे त्या वृद्धाला किती गंभीर दुखापती झाल्या असतील याची कल्पना आपण करू शकतो. तो हैवान त्या वृद्धाला एक किलोमीटरपर्यंत फरपटत घेऊन गेला. धक्कादायक बाब म्हणजे भरदिवसा ही घटना घडली; पण कोणीही त्याला थांबवण्यासाठी पुढे आले नाही. यावेळी त्याचा व्हिडीओ मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या बघ्यांनी कॅमेऱ्यात कैद केला होता. त्यानंतर कॅमेरा पाहताच तो माणूस थांबला. त्याची नजर व्हिडीओ शूट करणाऱ्या लोकांवर पडली आणि शेवटी त्याने स्कूटर थांबवली.
यावेळी व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने स्कूटर थांबविण्यासाठी सांगताच त्याने स्कूटर थांबवली. त्यानंतर ती वयोवृद्ध व्यक्ती धडपडत उभी राहिली. यावेळी ती वृद्ध व्यक्ती मी तुमच्या लोकांमुळे वाचलो, असे म्हणत होती. दरम्यान, स्कूटरचा समोरच्या बाजूने पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. वयोवृद्धाच्या कारने त्याच्या स्कूटरला धडक दिल्याने अपघात झाला आणि त्यानंतर स्कूटरचालकाने त्याला क्रूरपणे फरपटत नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्कूटरचालकाने रागाच्या भरात हे पाऊल उचलले, असेही बोलले जात आहे. पण, या क्रूर घटनेवर सर्व बाजूंने टीका होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ साल २०२३ मधील असल्याचा दावा कमेंटमध्ये केल आहे.
हा व्हिडीओ bengaluru_ig नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करीत आपापली मते मांडली आहेत. एका युजरने लिहिले की, स्कूटरचालकाला पकडून तुरुंगात टाकले पाहिजे. दुसऱ्या युजरने लिहिले की, जास्त शिकलेल्या व्यक्तींमध्ये इतकी क्रूरता येते कुठून? तिसऱ्या युजरने लिहिलेय की, ते वडिलांच्या वयाचे आहेत. त्यांच्याबरोबर असे वागताना लाज वाटली पाहिजे होती.