Shocking video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल आहे. भारताच्या बहुतांश रस्त्यांवर दारू प्यायल्यानंतर गोंधळ निर्माण करणारे लोक अनेक वेळा पाहिले गेले आहेत. दारूच्या नशेत काही लोक सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात; तर काही जण पोलिसांशी हुज्जत घालतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान आता एक संतापजनक आणि धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये एक व्यक्ती मंत्रालयाच्या भिंतीवर लघुशंका करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतात गावांमध्ये शौचालयाशी संबंधित अनेक समस्या पाहायला मिळतात. प्रशासनाने विविध योजना राबवून देखील बरेचसे लोक शौचालयाच्या ऐवजी शेतात, रानात शौच करण्यासाठी जातात. फक्त गावातच नाही शहरांमध्येही अशा अनेक समस्या पाहायला मिळतात. सार्वजनिक शौचालय असतानाही काहीजण रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत लघुशंका करतात. यामुळे अस्वच्छता पसरते. अशा घाणेरड्या गोष्टी शहरांमध्ये पाहायला मिळत आहेत. असाच धक्कादायक प्रकार दिल्लीमधून समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पांढरा शर्ट आणि पांढरी पँट घातलेल्या एका व्यक्तीनं मंत्रालय लिहलेल्या भींतीवर मुत्रालय असं वाचून चक्क लघूशंका केली आहे. यावेळी हा प्रकार कारमध्ये बसलेल्या कारचालकाने पाहिला आणि त्या व्यक्तीचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओमध्ये कारचालक त्या व्यक्तीला उद्देशून ‘अरे चाचा, तेथे मूत्रालय नाहीतर मंत्रालय लिहिले आहे’ असे म्हणतो आहे. नेटकरी मात्र व्हिडीओ पाहून चांगलेच संतापले आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @desimojito नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘काहीच सेन्स नाहीये आणि मग हेच लोक सरकारला दोष देतात’ असे म्हटले आहे. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत. एकानं म्हंटलंय, “हे मुद्दाम केलं आहे एवढा फरक न कळण्याइतक कोणी मुर्ख नाहीये” दुसरा म्हणतो, “या काकांचा जरा चेहरा पण व्हिडीओमध्ये घेतला पाहिजे होता.” तर आणखी एकानं, “हे लोक कधी सुधरणार काय माहिती” असा सवाल केला आहे.