Shocking viral video: लग्नात हुंडा देण्याची आणि घेण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. हुंडापद्धत भारतातील एक जाचक आणि महिलांसाठी अन्यायकारक पद्धत आहे. अनेकदा या हुंड्यापायी महिलांचा छळ होतो तर काही जणींचा हुंड्यापायी मृत्यूही झालेला. लग्नात हुंडा देणं किंवा घेणं हा एक गुन्हा मानला जातो. मात्र अजूनही काही ठिकाणी हुंडा प्रथा पाहायला मिळते. असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशातील जलालपूर येथे एका महिलेला हुंड्याच्या कारणावरून तिच्या सासरच्यांनी घरातून बाहेर काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.रंजना यादव असे या महिलेचे नाव आहे. तिचे लग्न गेल्या वर्षी मार्चमध्ये रमेश कुमार यादव यांच्याशी झाले होते. यानंतर सासरच्या मंडळींकडून सुनेचा वारंवार छळ केला जात होता, अशातच यावेळी तिला चक्क घरातूनबाहेर काढत तिच्या अंगावरचे दागीनेही हिसकावून घेतले. या घटनेनंतर तिने स्थानिक पोलिसांकडे धाव घेतली आणि तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध छळ केल्याबद्दल, तिचे सर्व दागिने हिसकावून घेतल्याबद्दल आणि ५ लाख रुपयांची मोठी रक्कम मागितल्याबद्दल तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला लग्नानंतर तिच्या पतीच्या घरी राहायला गेल्यावर तिने हुंडा म्हणून फ्रिज, कूलर, बेड आणि इतर काही वस्तू देऊ केल्या होत्या. तरीही तिच्या सासरच्या लोकांच्या मागण्या संपल्या नाही. ते वारंवार हुंडा मागत असे. तर यावेळी तिचे सर्व दागिने घेतले. तसेच त्यांनी तिला घराबाहेर हाकलून लावताना पाच लाख रुपये देण्याची मागणीही केली.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हुंड्याच्या मागण्या पूर्ण न केल्याने तिला तिच्या माहेरी पाठवण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी ती दरवाजात उभं राहून प्रतिकार करताना दिसत आहे, मात्र एका पुरूषाने तिला जबरदस्तीने बाहेर काढले. स्थानिक पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक संताप व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे.

Story img Loader