Shocking Viral Video : स्मशानभूमी हे नाव ऐकलं तरी अनेकांना भीती वाटते, जीव कासावीस होतो. इथे लोक दिवसा जायलाही घाबरतात. रात्रीच्या जाण्याविषयी तर विचार करूनही भीती वाटते. मात्र एका तरुणाने स्मशानभूमीलाच आपले घर करून घेतलेय. या तरुणाचा सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. कारण- व्हिडीओमध्ये तरुण चक्क जळत्या चितेवर असे काही करतोय, की तुमचाही थरकाप उडेल.
हा व्हिडीओ तुम्हाला प्रश्न पडेल की, तरुण अशा भयंकर स्थितीत नेमका का जगतोय, त्याच्यावर अशी वेळ का आली असेल. कारण- तरुणाचे कृत्यच इतके भयंकर आहे की, पाहतानाही भीती वाटतेय.
जळत्या चितेवर ठेवला तवा अन्…
व्हायरल व्हिडीओ हा एका स्मशानभूमीतील आहे. त्यात तुम्ही पाहू शकता की, एक राख झालेली चिता दिसत आहे. या चितेतील निखारे अजूनही धगधगत आहेत. यावेळी चितेजवळ उभा राहून एक तरुण हाताने भाकऱ्या बनवतोय आणि जळत्या चितेवर तवा ठेवून, दुसरीकडे तो भाकरी भाजतोही आहे. अशा प्रकारे चितेच्या धगधगत्या निखाऱ्यात तो भाकऱ्या भाजून घेतो. चितेच्य आजूबाजूला जेवणाची इतरही काही भांडी दिसत आहेत; ज्यात त्याने जेवण तयार केले आहे.
यावरून असे समजू शकते की, भाकऱ्यांबरोबरच त्याने या जळत्या चितेवर इतरही जेवणही शिजवून घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण स्मशानभूमीतच तंबू ठोकून राहतोय. चादर आणि प्लास्टिकच्या मदतीने त्याने राहण्यासाठी एक तंबू तयार केलाय. तरुणाला असे करताना भीती वाटत नाही का, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. अनेकांनी त्या तरुणास ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
हा भयानक व्हिडीओ @Nishantt023 नावाच्या इन्स्टाग्रामवरअकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, याला म्हणतात इतरांच्या चितेवर भाकऱ्या भाजणे. दुसऱ्याने लिहिलेय की, मला वाटते की तो कदाचित काही तंत्रक्रिया करीत असेल. तिसऱ्याने लिहिलेय की, या भावाचे यमराजांबरोबर संबंध आहेत वाटते.