Shocking Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांसंबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. विशेषत: श्वानांसंबंधित सर्वाधिक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही लोक असे असतात की, जे माणसापेक्षा कुत्र्याला अधिक जीव लावतात. त्याला मुलाप्रमाणे जपतात. पण, काही वेळा हाच प्राणी त्यांना अगदी नकोसा वाटू लागतो आणि मग ते त्याच्याबरोबर अतिशय क्रूरपणे वागू लागतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका श्वानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याच्याबरोबर त्याचा मालक अतिशय वाईट पद्धतीने वागताना दिसतोय. मालकाचे ते अमानवी कृत्य पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

धक्कादायक बाब म्हणजे धावत्या ट्रेनमध्ये मालक कुत्र्याबरोबर अतिशय वाईट पद्धतीने वागतोय. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका रेल्वे ट्रॅकवरून ट्रेन धावतेय. यावेळी ट्रेनच्या दरवाजाजवळ अनेक प्रवासी बसलेत. याच प्रवाशांच्या गर्दीतून एक प्रवासी पुढे येतो आणि तो ट्रेनचा वेग कमी होताच दरवाजात उभा राहतो आणि आपल्या श्वानाला सरळ ट्रेनबाहेर बाहेर फेकून देतो. त्यानंतर श्वान मालकाकडे जाण्यासाठी धावत्या ट्रेनच्या मागे धावत सुटतो; पण मालक त्याला वाचवण्यासाठी काहीच करीत नाही, यावरून एखादा व्यक्ती प्राण्याबरोबर किती निर्दयीपणे वागू शकतो हे दिसून येते, या दृश्यातून माणसातील माणुसकी मेल्याचे स्पष्ट होतेय. अनेक श्वानप्रेमींनी या व्हिडीओत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हा धडकी भरविणारा व्हिडीओ @joyfuse_009 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी कुत्र्याला धावत्या ट्रेनमधून फेकणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. एका युजरने लिहिलेय की, माणसातील माणुसकी मेलीय. दुसऱ्याने लिहिले की, त्या व्यक्तीलाही त्याच्या कर्माचे फळ मिळेल, अशी आशा आहे. तिसऱ्याने लिहिले की, एखादी व्यक्ती इतका निर्दयी कसा काय असू शकतो, त्याने श्वानाला चक्क कचऱ्यासारखं फेकलं, हा व्हिडीओ खरंच धडकी भरवणारा आहे.